Kiara Advani speaks about sushant singh rajput Google
मनोरंजन

सुशांत सोबतची 'नाइट आऊट' अन् त्याचे सीक्रेट्स; कियारा अडवाणीचा मोठा खुलासा

'भूलभूलैय्या २' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत कियारानं सुशांतच्या काही माहित नसलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी(Kiara Advani) आपल्या 'भूलभूलैय्या २'(Bhool Bhulaiyaa) सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. कियारा अडवाणी आणि सुशांत सिंग राजपूतची(Sushant Singh rajput) जोडी 'एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. सिनेमात कियारानं एम.एस.धोनीची पत्नी साक्षी हिची व्यक्तिरेखा साकारली होती. सिनेमात महेंद्र सिंग धोनीची व्यक्तिरेखा सुशांत सिंग राजपूतनं साकारली होती. बोललं जातंय की या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कियारा अडवाणी आणि सुशांत सिंग राजपूत खूप चांगले मित्र बनले होते. सुशांतला कियारा खूप चांगलं समजू लागली होती,इतके खास मित्र ते बनले होते. सुशांतनं २०२० मध्ये आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती अन् त्यात त्याचा मृत्यू झाला होता.

कियारा अडवाणीनं सुशांतच्या आठवणी आता शेअर करताना म्हटलं आहे की, ''औरंगाबाद मध्ये 'एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तिची आणि सुशांतची पहिल्यांदा ओळख झाली. 'द रणवीर शो पॉडकास्ट' कार्यक्रमात कियारानं सुशांतसोबतच्या या आठवणी शेअर केल्या आहेत. ती म्हणाली, आमचं शूटिंग औरंगाबदमध्ये सुरू झालं होतं आणि रात्री ८ वाजता पॅकअप झालं होतं. सकाळी ४ वाजता आमची फ्लाइट होती. मग आम्ही विचार केला की चला,आज थोडं नाइट आऊट करुया''. या दरम्यान सुशांतनं खूप गोष्टी कियारासोबत शेअर केल्याचं कियारा म्हणाली. एम.एस.धोनीसोबतच्या भेटीचे किस्से सुशांतनं सांगितल्याचं कियारा म्हणाली. करिअरची सुरुवात करताना प्रीती झिंटाच्या मागे डान्स करुन त्याची सुरुवात झाली ते त्याचं इंजिनिअरिंगमधलं शिक्षण आणि त्याच्याजवळची मोठमोठी पुस्तकं,त्याचं वाचन अशा अनेक गोष्टी त्या 'नाइट आऊट' दरम्यानं सुशांतनं कियारासोबत शेअर केल्या होत्या

कियारा पुढे म्हणाली,''सुशांत खूप हुशार होता. मी त्याला म्हणाले होते, एकदा तुझ्यावर देखील बायोपीक बनायला हवा. तू खूप इंट्रेस्टिंग माणूस आहेस. सुशांतला खूप गोष्टींचा ध्यास होता. आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो नेहमीच उत्सुक असायचा. त्याच्यात खूप जिद्द होती. सुशांतजवळ एक वही होती,ज्यात त्यानं धोनीला विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची नोंद करुन ठेवली होती. त्यानं धोनीच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी इत्तंभूत माहिती मिळवली होती''.

कियारानं याच पॉडकास्ट मुलाखतीत खुलासा केला की,''सुशांत फक्त दोन तास झोपायचा,आणि याचं मला कायम आश्चर्य वाटायचं. कारण फक्त दोन तास झोपूनही सुशांत दुसऱ्या दिवशी सकाळी शूटिंगला वेळेत हजर असायचा. त्याचं म्हणणं होतं की आपल्या शरीराला फक्त दोन तास झोपेची आवश्यकता आहे''. 'धोनी-द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी सुशांतला बेस्ट स्क्रीन अॅवॉर्ड मिळाला होता.तसंच, फिल्मफेअर अॅवॉर्डसाठीही त्याला नॉमिनेशन मिळालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT