आमिर खाननंतर भाचा इमरानही पत्नीपासून होणार विभक्त;लवकरच निर्णय जाहिर करणार

गेल्या काही वर्षांपासून इमरान-अवंतिका यांच्यातील नातं बिघडलं होतं आणि ते एकत्र देखील राहत नव्हते.
Imran khan-Avantika Malik
Imran khan-Avantika Malik Google

बॉलीवूड अभिनेता आणि आमिर खानचा(Amir Khan) भाचा इमरान खान(Imran Khan) आपला सिनेमा 'जाने तू जाने ना' मुळे प्रसिद्धिच्या झोतात आला. पण त्यानंतर इमरान फार सिनेमात दिसला नाही. आणि दिसला असला तरी त्याचे सिनेमे फारसे चालले नाहीत. अभिनेत्यानं आपली पत्नी अवंतिका मलिक(Avantika malik) सोबत २०११ मध्ये मोठ्या धामधूमीत लग्न केलं होतं. त्यावेळी दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण २०१९ साली या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या बातम्या कानावर पडल्या होत्या. हे दोघे तेव्हापासून एकत्र देखील राहत नसल्याचं बोललं जात आहे. पण आता इमरान-अवंतिकानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची पक्की बातमी हाती लागली आहे. अवंतिका-इमरान केव्हाही आपला घटस्फोटाचा(Divorce) निर्णय जाहिर करु शकतात असं देखील सांगण्यात येत आहे.

Imran khan-Avantika Malik
तू तेव्हा तशी: 'माझ्या खऱ्या आयुष्यातही 'पट्या' होता पण...'- शिल्पा तुळसकर

हाती लागलेल्या वृत्तानुसार,अवंतिका-इमरानचे कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी दोघांमधील नातं चांगलं व्हावं,वाद मिटावेत यासाठी सर्वपरीनं प्रयत्न केल्याचं कळत आहे. म्हटलं जात आहे की सर्वात अधिक हे नातं टिकावं म्हणून अवंतिका प्रयत्न करत होती. तिला आपल्या नात्याला एक संधी द्यायची होती. पण तिचे हे प्रयत्न असफल ठरले आहेत. बातमी आहे की,इमरान खानलाच हे नातं संपवायचं होतं. अखेर दोघांनीही घटस्फोट घेण्याचा अंतिम निर्णय घेतला असल्याच्या बातमीचा खुलासा झाला आहे. अद्याप दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज केला नसला तरी लवकरच त्या प्रक्रियेला सुरुवात होईल असं कळत आहे.

Imran khan-Avantika Malik
'बाळासाहेबांनी आदेश देऊनही आनंद दिघेंनी तो पाळला नव्हता कारण...'- प्रसाद ओक

२०११ मध्ये इमरान-अवंतिकानं लग्न केलं होतं, या दोघांना एक ७ वर्षांची मुलगी आहे. वेगळं झाल्यानंतर गेल्या वर्षी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मित्र-परिवारातील एकाच्या लग्नाच्या निमित्तानं हे दोघे एकत्र कॅमेऱ्यात क्लीक झाले होते. पण त्या फोटोवरुन कळत होतं की या दोघांत काहीच ठीक सुरु नाही. हे दोघे २०१९ पासूनच वेगळे राहत आहेत. या दरम्यानं इमराननं निर्णय घेतला आहे की अवंतिका सोबतचं त्याचं नातं आता संपलं आहे. तो आता या नात्यावर काही बोलण्यालाही महत्त्व देत नाही असं त्याच्या जवळच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com