kiran mane, kiran mane upcoming movies, bigg boss marathi 4 SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: मातीतला माणूस..! किरण मानेंनी सासुरवाडीत गावकऱ्यांसोबत केली खास हुरडा पार्टी

किरण माने बिग बॉस नंतर महेश मांजरेकरांसोबत एका आगामी प्रोजेक्ट मध्ये झळकणार आहेत

Devendra Jadhav

Kiran Mane News: किरण माने बिग बॉस मराठी ४ नंतर सतत चर्चेत असतात. किरण माने यांनी बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली होती.

वयाच्या ५२ व्या वर्षी तरुण पोरांच्या खांद्याला खांदा लावून किरण माने यांनी जबरदस्त खेळ खेळत फायनल पर्यंत मजल मारली.

किरण माने बिग बॉस नंतर साताऱ्यात त्यांच्या गावातील लोकांमध्ये वेळ घालवत आहेत. नुकतेच किरण माने त्याच्या सासुरवाडीत गेले होते. तिथे त्यांनी हुरडा पार्टी केली.

(Kiran Mane held a special hurda party)

किरण माने यांनी सोशल मीडियावर हुरडा पार्टीचे खास फोटो पोस्ट केले आहेत. किरण माने लिहितात..

आपल्यावर जीवापाड माया करनार्‍या गनगोतांचा मेळा जमवून हुरडा पार्टी करन्यात जी मजा हाय ना, ती फाईव्ह स्टार हाटीलातल्या पार्टीतबी नाय भावांनो...शेतातल्या ज्वारीची ताटं काढून आनायची. कनसं बाजूला करायची.

जमिनीत एक बारका खड्डा खनून त्यात शेनाच्या गवर्‍या पेटवायच्या... त्या इस्तवावर कनसं भाजायची... भाजल्याव ती हाताव घिवून चोळून कनसाचं दानं बाजूला काडल्याव मिळतो त्यो 'हुरडा' !

आन् हो, शेतात राबनार्‍या हातानंच ती चोळावी बरं का... अशा या हुरड्याची चव म्हंजी आहाहाहा.. जन्नत वो जन्नत. नादखुळा.

परवा सासूरवाडीला - धामणेरला कृष्णेकाठी शेतात अशीच आमची हुरडा पार्टी रंगली. दरवर्षी ह्यो बेत असतोच. ह्यावेळी माझ्या शुटिंगच्या धावपळीमुळं सारखं कॅन्सल होत होत शेवटी परवा पार पडला.

मी बी सासर्‍यांबरोबर, मेहुणे आणि साडूंबरोबर बसून कणसं भाजली, चोळली, हुरडा खाल्ला. हुरड्याबरुबर तोंडी लावायला शेंगदान्याची-लसनाची चटनी होती.. उकडलेल्या शेंगा.. वल्लं कवळं खोबरं होतं...

जोडीला अस्सल घट्ट दह्याची वाटीबी होती. या सगळ्यावर मनसोक्त ताव मारत आम्हा पै-पावन्यांचा गप्पांचा फड अस्सा रंगला... गांवाकडच्या इरसाल नमुन्यांचे, ग्रामपंचायतींच्या राजकारनाचे एकसो एक भन्नाट किस्से ऐकून हसून हसून पुरेवाट झाली.

हे जे निसर्गाच्या, आपल्या मानसांच्या गोतावळ्याच्या सहवासातलं अस्सल जगनं हाय ना माझ्या भावांनो... ते आपल्या लेकरांनी अनुभवावं असं हल्ली लै मनापास्नं वाटतं...इतर अनेक गोष्टींसारखं पुढच्या काळात हे बी हरवून जाईल का काय? अशी भिती वाटती...

हल्ली शहरात र्‍हानारी आमची सगळी लहान पोरंपोरी उड्या मारत रानातनं पळत होती...धडपडत ढेकळं तुडवत होती.. वडाच्या पारंब्यांना लोंबकळत होती... गुराख्यांबरोबर शेरडं हाकत चालत होती... ते बघून लै लै लै समाधान वाटलं.

मी खर्‍या अर्थानं रमतो ते अशा ठिकानी. तुकोबारायांच्या शब्दांत सांगायचं तर "आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥"

अशाप्रकारे किरण माने यांनी हुरडा पार्टीचं खास वर्णन केलंय. किरण माने बिग बॉस नंतर महेश मांजरेकरांसोबत एका आगामी प्रोजेक्ट मध्ये झळकणार आहेत. किरण माने आणि महेश मांजरेकरांचा हा प्रोजेक्ट नेमका काय आहे याचा उलगडा लवकरच होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT