Kisi Ka Bhai Kisi ki jaan salman khan Bollywood actor  esakal
मनोरंजन

Kisi Ka bhai Kisi ki jaan : 'सलमानला व्हायचंय 'टॉलीवूडचा हिरो!' म्हणून तर आता...'

बॉलीवूडच्या भाईजानच्या नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. नव्या वर्षात सलमान खान किसी का भाई किसी की जान मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kisi Ka bhai Kisi ki jaan : बॉलीवूडच्या भाईजानच्या नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. नव्या वर्षात सलमान खान किसी का भाई किसी की जान मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावरुन त्याच्यावर वेगवेगळ्या पोस्टही व्हायरल झाल्या आहेत. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटातील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सलमान खान आपल्या आगामी 'किसी का भाई किसी की जान'या चित्रपटातील गाण्यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रोमँटिक ट्रॅक 'नैयो लगदा', पंजाबी डान्स नंबर 'बिल्ली बिल्ली', 'फॉलिंग इन लव्ह' आणि 'बठुकम्मा'या गाण्यांवर सिनेप्रेमींनी प्रेमाचा वर्षाव केला. दर्शकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच, सलमानने आता हिंदी-तेलुगू फ्युजन असलेले सिनेमातील चौथे गाणे 'येंतम्मा'च्या टीझरचे अनावरण केले आहे.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

या टीझरमध्ये सलमान आणि व्यंकटेश लुंगीमध्ये दिसत आहेत. हिंदी-तेलुगूचे फ्युजन असलेल्या आणि जानी मास्टर यांनी कोरियोग्राफी केलेल्या 'येंतम्मा'या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत तर, पायल देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तसेच, विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणे गायले असून, रफ्तारने रॅप केले आहे.

दरम्यान, गाण्याच्या टीझरच्या शेवटी डान्स फ्लोअरवर सलमान खान आणि व्यंकटेशसोबत एक मिस्ट्री मॅनची एन्ट्री होते. हे पाहून सर्वांना प्रश्न पडला आहे की हा मिस्ट्री मॅन राम चरण तर नाही ना? याआधी, हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर राम चरण, सलमान आणि व्यंकटेश यांना एकत्र स्पॉट केल्याच्या चर्चा होत्या. चर्चांवर विश्वास ठेवला तर, 'येंतम्मा'हे गाणे सलमान खान, व्यंकटेश, पूजा हेगडे आणि राम चरण यांचा डान्स लोकप्रिय झाला आहे. अशातच, 'किसी का भाई किसी की जान'मधील 'येंतम्मा'हे गाणे आता प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT