Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan  esajak
मनोरंजन

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : 'जर माझा चित्रपट चालला नाहीतर मी...' सलमानचं मोठं वक्तव्य!

सलमानच्या त्या वक्तव्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यानं पहिल्यांदाच...

युगंधर ताजणे

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman Khan Share film box office : बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान नावाच्या चित्रपटाचा काल ट्रेलर प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियाला उधाण आले आहे. दुसरीकडे त्याचे मीम्सही व्हायरल झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमानच्या चाहत्यांना त्याच्या या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. तो प्रदर्शित झाल्यानंतर मात्र त्याला संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. कित्येक नेटकऱ्यांनी सलमानवर सडकून टीका केल्याचे दिसून आले आहे. सलमानचे वय, त्याचे दिसणे, त्याची ती नेहमीचच स्टाईल आणि तो स्वॅग यावरुन चाहत्यांनी त्याला प्रतिक्रिया भलत्याच गंमतीशीर आहे. त्यावरुन त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले आहे.

Also read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सलमाननं त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना बॉलीवूडचे चित्रपट चालत का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंच या प्रश्नाचे उत्तरही दिले होते. तो म्हणाला, मला वाटतं आम्हीच चांगले चित्रपट तयार करत नाही. त्यामुळे आमचे चित्रपट पाहायला कुणी येत नाही. प्रेक्षकांना त्याच त्या गोष्टी नको आहेत त्यामुळे त्यांना रटाळपणा जाणवल्यानं लाखो प्रेक्षकांनी हिंदी चित्रपटापासून फारकत घेतल्याचे सलमाननं म्हटले आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan

यानंतर त्यानं किसी का भाई किसी की जान हा त्याचा चित्रपट चालला नाही तर काय होईल, यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, हा चित्रपट हिट होणं महत्वाचं आहे. माझी खूप इच्छा आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करावी. मात्र तसे झाले नाहीतर त्याचे सगळे बिल हे माझ्याच नावावर येईल. त्याची जबाबदारी मला घ्यावी लागणार आहे. यापूर्वी सलमानचा अंतिम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो फ्लॉप झाला.

चित्रपट चालला नाहीतर लोकं काय म्हणणार की, याच माणसामुळे चित्रपट चालला नाही. ते सगळा दोष मलाच देणार, त्यामुळे तसे झाल्यास मी ती सगळी जबाबदारी घेईल. या चित्रपटाची ओरिजनल स्क्रिप्ट ही अजुनही माझ्याजवळ असल्याचे सलमाननं यावेळी म्हटले आहे. किसी का भाई किसी की जान नावाचा चित्रपट हा २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Timber Transport Bribe : सागवान वाहतुकीसाठी लाच; तिघे जाळ्यात कंत्राटी संगणक ऑपरेटरला रंगेहात पकडले; जुन्या घराच्या लाकडासाठी मागितले पैसे

WCL Officer Bribe Case : बिलासाठी मागितली ५० हजारांची लाच डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या जाळ्यात

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार पडळकर, खाडेंसह ६४ अर्ज दाखल; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Sangli Crime : सांगली हादरली! गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; 'शिवप्रतिष्ठान युवा'च्या तत्परतेने इम्रानवर गुन्हा, आणखी 20 महिला जाळ्यात अडकल्याचा दावा

SCROLL FOR NEXT