Koffee with karan 7 new promo anil kapoor varun dhawan karan johar,watch video Esakal
मनोरंजन

Koffee with karan 7: वरुण धवनने अर्जुन कपूरची उडवली खिल्ली; म्हणाला,'तो नेहमीच...'

Koffee with karan 7 मध्ये वरुणनं अर्जुनची खिल्ली उडवल्यावर तिथे उपस्थित अनिल कपूर यांनी आपल्या पुतण्याची बाजू घेतली .

प्रणाली मोरे

Kofffee With karan 7: निर्माता करण जोहरचा(Karan Johar) प्रसिद्ध चॅट शो कॉफी विथ करण 7 मध्ये यंदा अनिल कपूर आणि वरुण धवन गेस्ट म्हणून हजर राहिले होते. या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे आणि खूपच मजेदार प्रोमो बनला आहे. शो मध्ये दोघांनीही करण जोहरच्या प्रश्नांची खूप विनोदी अंदाजात उत्तरं दिली आहेत,ती ऐकून हसू आवरणं कठीण होऊन बसेल. तर एका प्रश्नावर वरुण धवनने अर्जून कपूरची जोरदार खिल्ली उडवली आहे. पण यावेळी काका अनिल कपूर यांनी मात्र पुतण्याची बाजू सावरलीय. आणि म्हटलं आहे,'तो माझा पुतण्या आहे...'(Koffee with karan 7 new promo anil kapoor varun dhawan karan johar,watch video)

कॉफी विथ करण 7 च्या 11 व्या एपिसोडमथ्ये वरुण धवन आणि अनिल कपूर यांनी लग्न, नातं आणि इंडस्ट्रीमधील स्पर्धा या विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यादरम्यान अनेक प्रसिद्ध कलाकारांवर जोक्सही मारले. त्यामुळे ही जोडी करणच्या चॅट शो च्या नवीन एपिसोडमध्ये मनसोक्त मनोरंजन करणार हे नक्की.

हा एपिसोड प्रेक्षकांसाठी लग्नासंबंधित प्रश्नांनी भारलेला पहायला मिळणार आहे. कारण अनिल कपूर गेली ४० वर्ष आपलं वैवाहिक आयुष्य सुखानं जगत आहेत. तर वरुण धवनचे नुकतेच लग्न झाले आहे,पण बायको नताशा लग्नाआधी त्याची चांगली मैत्रिणही होती. अनिल कपूर या शो मध्ये म्हणताना दिसतील की,''तुम्हाला तुमच्या बायकोची प्रशंसा करायला हवी,ती देखील मनापासून आणि असं काम करायला हवं ज्यामुळे त्यांना आनंद मिळेल. अर्थात त्यावेळी हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल की त्या तुम्हाला कसं खुश करतायत''.

रॅपिड फायर राऊंडमध्ये करण जोहर वरुण धवनला कितीतरी प्रश्न विचारतो,ज्यात वरुण धवन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना अर्जुन कपूरचं(Arjun kapoor) नाव घेतो. करण जोहर विचारतो,'सेल्फी चांगला येण्यासाठी कोण खूप मेहनत घेतो? कोण जास्त गॉसिप करतो?कोण चुकीची स्क्रिप्ट निवडतो?' आपल्या पुतण्याची इतकी खिल्ली उडवताना पाहून शेवटी अनिल कपूर यांना राहावलं नाहीआणि ते मध्येच म्हणाले,'माझा पुतण्या आहे तो'. आणि हे ऐकून पुन्हा वरुण आणि करण हसू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT