Kranti Redkar Video Viral Esakal
मनोरंजन

Kranti Redkar: एकीचा पाय फ्रॅक्चर तर दुसरीनं...क्रांतीच्या जुळ्या मुलींच्या व्हिडीओचं सगळीकडे कौतुक

Vaishali Patil

Kranti Redkar Video Viral: मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे क्रांती रेडकर. तिने 'जत्रा', 'फक्त लढ म्हणा', 'खो-खो, 'शिक्षणाच्या आईचा घो', 'तीन बायका फजिती ऐका' यांसारख्या बऱ्याच चित्रपटातून तिनं काम केलं आहे.

क्रांती ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या कामाबरोबच वैयक्तीक आयुष्यामुळेही लाईमलाईटमध्ये राहते.

क्रांती ही अभिनय क्षेत्रातच नाही तर सोशल मीडियावरही खुप सक्रिय असते. ती सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असते.

क्रांती अनेकदा व्हिडीओ रील, कुटुंबियांचे काही मजेदार किस्से व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता तिने असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केलं आहे. हा व्हिडिओ तिच्या दोन्ही लाडक्या जुळ्या लेकींचा आहे.

या व्हिडिओत तिने झायदा आणि झियाबद्दल एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे. यातच तिच्या एका मुलीच्या पाय फ्रॅक्चर झाल्याचंही सांगितलंय.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, "तर, गोडोटच्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे तिच्या पायाला महिनाभर प्लास्टर लावलेल होतं. ती अजूनही पुन्हा चालायला शिकतेय. ती खुपच धाडसी, धीर आणि समजूतदार आहे. पण इथे आमची खरी हिरो ठरली आहे ती मिस छबिल वानखेडे, जी सावलीसारखी तिच्या पाठीशी आहे."

पुढे मुलींच्या शाळेतला किस्सा सांगताना क्रांती लिहिते की, " जेव्हा शाळेत ओपन हाउस होतं त्यावेळी शाळेतील कर्मचारी मला सांगतात की 'झायदा कितना करती है उसके लिए'. ती तिची काळजी घेते, ती तिच्या बॅगेतून पुस्तकं काढते, तिची बॅग पुन्हा पॅक करते.

ती वॉशरूममध्ये असेपर्यंत बाहेर थांबते, तिला तिचा टिफिन उघडून देते. झियाच्या पायाला लागलं होतं मात्र , जिया प्रत्येक कामात मदत करत होती. तिची लहानमोठी काम करायचे."

"आम्ही ओपन हाऊस झाल्यानंतर शाळेतुन घरातून घरी परतलो आणि आम्ही सर्वांनी दोन्ही मुलींसाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या. त्यांचे कौतुक केले. दोघांमध्ये असचं प्रेम वाढेल अशी आशा करते. आम्हाला कठीण काळात आनंदाने पुढे जाण्यासाठी शक्ती दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानते". हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत दोघींचं कौतुक केलं आहे.

अशाप्रकारे लेकींचं कौतुक करताना क्रांतीने दोघींचा एक व्हिडिओ देखील शेयर केला ज्यात झियाला चालण्यासाठी झायदा मदत करताना दिसते. क्रांतीने 2018 मध्ये झायदा आणि झियाला जन्म दिला.

क्रांती नेहमीच दोन्हीच्या गमतीजमती चाहत्यासोबत शेयर करत असते. तिच्या मुली पाच वर्षांच्या झाल्या आहेत मात्र तरीही क्रांतीने लेकीचे चेहरे दाखवले नाहीत. सध्या ती ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT