KRK on Rashmika Mandanna KRK criticizes Rashmika mandanna for her acting in animal
KRK on Rashmika Mandanna KRK criticizes Rashmika mandanna for her acting in animal SAKAL
मनोरंजन

KRK: 'अभिनय येत नसला तरी बॉलिवूडमध्ये काम मिळतं', केआरकेचा रश्मिकाला टोला; कतरिना-जॅकलिनवरही निशाणा

Devendra Jadhav

KRK on Rashmika Mandanna: 'अ‍ॅनिमल' सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपुर्वी रिलीज झाला. ट्रेलरमध्ये रणबीर कपूरने त्याच्या अभिनयाने प्रेक्षक - समीक्षक सर्वांचं मन जिंकलं. रणबीर कपूरच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होतंय.

अशातच समीक्षक आणि अभिनेता के आर के अर्थात कमाल आर खानने अ‍ॅनिमल मधील रश्मिकाच्या अभिनयाची खिल्ली उडवली आहे. काय म्हणाला के आर के बघा.

रश्मिकाबद्दल काय म्हणाला केआरके?

केआरकेने एक्स अकाऊंटवर 'अ‍ॅनिमल' ट्रेलरची एक क्लिप शेअर केली. या क्लिपमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना दिसत आहेत.

ट्रेलरमध्ये असलेला रश्मिकाचा एक व्हिडीओ पोस्ट करुन केआरकेने कॅप्शन लिहीलंय की, 'रश्मिका मंदानाला अभिनय कसा करावा हे माहित नाही आणि तरीही तिला चित्रपट मिळत आहेत त्याचा हा पुरावा आहे. पण जर बॉलीवूडमध्ये फक्त अभिनय हा निकष धरुनच चित्रपट द्यायचे झाले असते तर कतरिना, जॅकलीन, नर्गिस वगैरे आज अभिनेत्रीच नसत्या." अशी टिका केआरकेने केलीय.

अ‍ॅनिमल सिनेमाचा रनटाईम आणि सेन्सॉर सर्टिफिकेट

रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर यांची प्रमुख भुमिका असलेल्या अ‍ॅनिमल सिनेमाचा लांबी खुप मोठी आहे. तब्बल ३ तास २१ मिनीटं लांबीचा हा सिनेमा असणार आहे. त्यामुळे सध्याच्या फास्ट जमान्यात प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा होणार, यात शंका नाही.

याशिवाय सेन्सॉरकडून सिनेमाला A सर्टिफिकेट मिळालंय. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा सिनेमा रोमान्स आणि अ‍ॅक्शनचा मसाला असणार यात शंका नाही.

या दिवशी अ‍ॅनिमल सिनेमा येणार भेटीला

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीजची निर्मिती असलेला अ‍ॅनिमल सिनेमाची सध्या खुप चर्चा आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील आहे. सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल अशा कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 ला सिनेमागृहात रिलीज होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT