Salman Khan,KRK Instagram
मनोरंजन

KRK: 'मी आज कोर्टाला विनंती करणार आहे की..', 'किसी का भाई किसी जान' सिनेमा वरनं केआरके पुन्हा भिडला सलमानला

बॉलीवूड विरोधात नेहमीच काही ना काही बोलून केआरके चर्चेत येण्याचा प्रयत्न करत असतो. आता सलमानच्या नव्या सिनेमा विरोधात थेट हाय कोर्टात पोहोचलाय.

प्रणाली मोरे

KRK Tweet: बॉलीवूड अभिनेता सलमान त्याचा आगामी 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे चर्चेत आहे, सिनेमा रिलीजच्या जवळ आहे आणि अशामध्ये सलमान सोबत सिनेमातील इतरही स्टारकास्ट जोरदार सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत.

यादरम्यान स्वघोषित समिक्षक केआरकेनं सांगितलं आहे की मुंबई हायकोर्टात तो आहे आणि परवानगी घेऊन तो सिनेमाचा रिव्हयू करणार आहे.(KRK seeks permission to mumbai high court permission to review salman khan movie kisi ka bhai kisi ki jaan)

केआरकेनं एक ट्वीट करत लिहिलं आहे ज्याचं कनेक्शन 'किसी का भाई,किसी की जान' सिनेमाशी आहे. केआरके म्हणाला,''आज मी केआरके वर्सेस सलमान खान केस साठी मुंबई हायकोर्टात असेन. मी कोर्टाकडून सलमान खानचा आगामी सिनेमा 'किसी का भाई किसी की जान' चा रिव्ह्यू करण्याची परवानगी मागण्याचा प्रयत्न करेन''. केआरके च्या या ट्वीटवर आता सोशल मीडिया युजर्स रिअॅक्ट होताना दिसत आहेत.

केआरके हा स्वयंघोषित समिक्षक आहे हे वेगळे सांगायला नकोच. तो आपल्या युट्युब चॅनेलवर सिनेमांचे रिव्ह्यू करून टाकतो. अशामध्ये त्यानं सलमानच्या 'राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई' विषयी खूपच वाईट आणि नकारात्मक रिव्ह्यू दिला होता.

त्यानंतर केआरके म्हणाला होता की सलमानकडून त्याच्यावर मानहानीची केस दाखल करण्यात आली होती. सलमानच्या वकीलांनी मात्र तेव्हा म्हटलं होतं की ही केस रिव्ह्यू संदर्भात नाही तर मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपां अंतर्गत करण्यात आली आहे.

KRK Tweet On Salman khan Kisi ka Bhai Kisi Ki Jaan

केआरकेनं यानंतर सोशल मीडियावर खूप सारे ट्वीट्स केले होते आणि त्यानंतर त्यानं निर्णयही केला होता की तो सलमानच्या कोणत्याच सिनेमाचा रिव्ह्यू करणार नाही. अर्थात यानंतर केआरकेनं सलमान खानवर ट्वीट्स केलेच,तो काही बोलल्या शब्दाला जागताना दिसला नाही. तर आता केआरकेनं कोर्टाची मदत घ्यायचं ठरवलं आहे जेणेकरून तो सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाचा रिव्ह्यू करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: चक्क RAW संचालक बनून लग्न! महिला न्यायाधीशाला फसवंल... पण सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वच थक्क!

World Toilet Day 2025: 'टॉयलेट डे'ची सुरुवात कोणी आणि का केली? कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल!

'हे तर ISISसारखं…' धुरंधर ट्रेलरवर ध्रुव राठींचा रोष, प्रेक्षकही थक्क, फक्त हिंसा, खुन-खराबा आणि टॉर्चर

Indira Gandhi:'गरिबांच्या अम्मा घ्यायच्या दिवसात १२ ते १५ सभा'; इंदिरा गांधी यांचा झंजावात, जुन्या जाणत्यांना १९८० ची लख्ख आठवण..

बापरे! अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर? भर थंडीत फोडला घाम, प्रादेशिक हवामान विभागाचा प्रताप

SCROLL FOR NEXT