kamal khan
kamal khan  Team esakal
मनोरंजन

'विवेक, जॉन, अरिजित साधी पोरं, सलमानचा पंगा चुकीच्या माणसाशी'

युगंधर ताजणे

मुंबई - केआरके उर्फ कमाल खान( krk ) याची बडबड काही कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यानं दोन दिवसांपूर्वी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या (salman khan ) राधे(radhe your most wanted bhai) मुव्हीचा रिव्ह्यु केला होता. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. यानंतर त्याच्याविरोधात सलमाननं कोर्टात धावही घेतली आहे. मात्र कमाल खान काही शांत बसायला तयार नाही. त्यानं आता पुन्हा एकदा वादग्रस्त व्टिट केले आहे. त्यात त्याने अशा सेलिब्रेटींची नावे घेतली आहे ज्यांचे सलमान सोबत छत्तीसचा आकडा आहे. त्यामुळे कमाल खान पुन्हा नव्या वादात सापडला आहे. (krk tweet salman khan says vivek oberoi john abraham arijit singh innocent messed-up wrong guy)

सलमान (salman) आणि केआरके (krk) मधील वाद टोकाला जात असल्याचे दिसून आले आहे. तो वाद चिघळवण्यासाठी केआरकेनं पुढाकार घेतला आहे. कारण त्यानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट. सलमाननं जेव्हा कोर्टात त्याच्याविरोधात धाव घेतली तेव्हा केआरकेनं माफी मागण्याचे धोरण स्वीकारले होते.त्यासाठी तो सलमानच्या वडिलांकडेही गेला होता. सध्या सलमाननं त्याच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे.

krk post
krk post 2

केआरकेनं राधे मुव्हीवर रिव्ह्यु केला होता. त्यामुळे सलमान त्याच्यावर चिडला होता. सलमानला माझा रिव्ह्यु जर आवडला नसेल तर त्याने तसे सांगायला हवे होते. माझ्या रिव्ह्युमुळे त्याला त्रास झाला हे ऐकून आश्चर्य वाटत असल्य़ाचेही केआकेनं सांगितलं. आता त्यानं त्याच्या व्टिटमध्ये सलमानची ज्यांच्याबरोबर भांडणं आहेत त्यांची नावे घेतली होती. त्यात अभिनेता विवेक ऑबेरॉय़(Viek Oberoy), गायक अरिजित सिंग (Arijeet singh), जॉन अब्राहम (John abraham) यांचा समावेश आहे.

कोणी एखादा निर्माता किंवा दिग्दर्शक जर मला त्यांच्या चित्रपटाचा रिव्ह्यु करु नका असे सांगत असतील तर मी तो रिव्ह्यु करत नाही. मात्र जर सलमान मला विनंती करुन सांगणार असेल तरीही मी त्याच्या गाण्याचे रिव्ह्यु करणार असे केआरके खान म्हणतो. हा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यानं सांगितलं की, सलमाननं यापूर्वी विवेक, जॉन आणि अरिजितशी पंगा घेतला होता. ती साधी मुलं होती. मात्र यावेळी सलमाननं चूकीच्या माणसासोबत वैर पत्करलं आहे. अशा शब्दांत केआरकेनं सलमानला सुनावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT