KRK Latest News KRK Latest News
मनोरंजन

KRK : केआरकेने गमावली २० टक्के स्मरणशक्ती; ट्विट करून म्हणाला, मी मेलो तर...

बरेच लोक विचारत आहेत की मी व्हिडिओ का बनवत नाही?

सकाळ डिजिटल टीम

KRK Latest News समीक्षक आणि अभिनेता केआरके (KRK) आता सोशल मीडियावर कमी सक्रिय असतो. पूर्वी तो एका दिवसात १०-२० ट्विट करीत असे. आता तो दोन-तीन दिवसांत एक-दोन ट्विट करतो. यामुळे केआरकेचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. केआरकेने काही ट्विट करताना आश्चर्यकारक गोष्टींचा खुलासा केला आहे. स्मरणशक्ती कमी होत असल्याचे केआरकेने म्हटले आहे. त्याचबरोबर त्याने सुशांत सिंग राजपूतबद्दलही (Sushant Singh Rajput) सांगितले आहे.

तुरुंगात माझी २० टक्के स्मरणशक्ती गमावली आहे. तिथे १० दिवसांत काहीही खाल्ले नाही. माझी स्मरणशक्ती परत येऊ शकत नाही. येत्या काळात आणखी जाऊ शकते, असे डाक्टरांचे म्हणणे आहे. जर मी मेलो तर जनतेला हे लक्षात ठेवावे की आधी त्यांनी सुशांत सिंग राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) असे केले आणि आता ते माझ्यासोबत करीत आहेत, असे केआरकेने (KRK) पहिल्या ट्विटमध्ये लिहिले.

बरेच लोक विचारत आहेत की मी व्हिडिओ का बनवत नाही? मला बऱ्याच गोष्टी आठवत नाही. जेव्हा मी रेकॉर्डिंग करत असतो तेव्हा मला माझी पुढची ओळ क्वचितच आठवते. याचा अर्थ काही बॉलिवूड लोक मला रोखण्यात यशस्वी झाले आहेत. मी समीक्षण बंद करण्याचे हेच मुख्य कारण आहे. असे दुसऱ्या ट्विटमध्ये केआरकेने लिहिले.

यावर सोशल मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे केआरकेच्या प्रकृतीबद्दल काही चाहते चिंतेत आहेत. चांगला उपचार घेण्याची विनंती करीत आहेत. दुसरीकडे काही ट्विटर युजर्स ट्रोल करीत आहेत. केवळ बातम्यांमध्ये राहण्यासाठी तो हे सर्व करीत असल्याचे म्हणत आहे. काही ट्विटर युजर्सनी सुशांतच्या नावाचा उल्लेख पसंत केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Marathi News Live Updates : गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

SCROLL FOR NEXT