Akshay Kumar OMG 2 Esakal
मनोरंजन

Akshay Kumar OMG 2: अक्षयचं फ्लॉप करिअर महादेव वाचवणार? 'OMG 2' चं पोस्टर रिलिज..टिझरही लवकरच..

Vaishali Patil

Akshay Kumar OMG 2: अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा किंग म्हणुन अभिनेता अक्षय कुमारला ओळखलं जातं. अक्षय कुमार हा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मात्र आता तो पुन्हा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपुर्वीच त्याने एक पोस्टर शेयर करत त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचा मोस्ट अवेडेट चित्रपट 'OMG2' हा लवकरच रिलिज होणार आहे.

दरम्यान अक्षयने आता पुन्हा चाहत्यांची उत्सूकता वाढवली आहे. त्याने या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आहे. ज्यात तो भगवान शंकराच्या भूमिकेत दिसत आहे. या पोस्टसोबतच त्याने या चित्रपटाचा टिझर लवकरच रिलिज होणार असल्याचेही सांगितले आहे. आता त्याचे हे पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या लूकची प्रशंसा करत आहे.

काही वेळापुर्वीच अक्षयने एक पोस्टर शेयर केलं होतं ज्यात तो महादेवाच्या लुकमध्ये दिसत होता. लांब जटा, अंगभर भस्म आणि हातात डमरू असा अक्षयचा दमदार लुक समोर आला. हे पोस्ट शेयर करत त्याने चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली होती.

'OMG 2' (O MY GOD 2 ) हे चित्रपटाचं नाव असून तो 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर अक्षय कुमार सोबत अभिनेत्री यामी गौतम, अभिनेता पंकज त्रिपाठी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सोबतच अनेक कलाकार आणि वेगळ्या धाटणीच्या विषयावर आधारित हा चित्रपट असेल असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीणच वाढली आहे.


तर दुसरीकडे अक्षय कुमार बद्दल बोलायचं झाले तर गेले काही दिवस त्याच्यासाठी काही खास चांगले ठरलेले नाहीत. त्याने एकामागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. गेल्या एका वर्षात अक्षयने थिएटरमध्ये 5 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी त्यानंतर बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, कठपुतली, राम सेतू आणि त्यानंतर इम्रार हाश्मीसोबतचा सेल्फी हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकले नाहीत. त्यामुळे आता OMG2 हा चित्रपट अक्षयच्या फ्लॉप चित्रपटांवर फुलस्टॉप लावेल का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या वर्षी, तो ओह माय गॉड 2 सोबतच Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये आणि टायगर श्रॉफसोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट दिसेल. त्याचबरोबर तो 'हेरा फेरी 3' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातून तो मराठी चित्रपटातही एन्ट्री करेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT