Kushal Badrike Instagram
मनोरंजन

Kushal Badrike: 'ही दिसते जामची बरणी अन् वागायला उषा नाडकर्णी..', 'या' मराठी अभिनेत्रीवर कुशलनं साधला निशाणा

सध्या कुशल बद्रिके सोशल मीडियावर जे पोस्ट करतोय त्याची जोरदार चर्चा होताना दिसते.

प्रणाली मोरे

Kushal Badrike: कुशल बद्रिके सोशल मीडियावर सध्या भलताच सक्रिय पहायला मिळतो. अर्थात कुशल बद्रिके म्हणजे विनोदी नट, त्यामुळे त्याच्याकडून अनेकांची अपेक्षा असणार काहीतरी विनोदी पोस्ट शेअर करेल याची. पण जर का आपण गेल्या काही दिवसांपासून कुशलच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट पाहिल्या असतील तर त्या खूप वैचारिक अशा पोस्ट आहेत.

त्यामुळे अर्थातच नेहमी 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावरनं सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या कुशलचा हा बदललेला अंदाजही सगळ्यांना आवडतोय हे वेगळं सांंगायला नको. आता सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,ज्यात एका मराठी अभिनेत्रीवर रोख धरत कुशल बद्रिके म्हणालाय,'ही दिसते जामची बरणी अन् वागते उषा नाडकर्णी..'

चला जाणून घेऊया नेमकं कुशल हे कुठे,कुणाला आणि कधी म्हणालाय...

सर्वप्रथम इथे स्पष्ट करतो की कुशल बद्रिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय तो 'चला हवा येऊ 'द्या या कार्यक्रमातील आहे. या वेळच्या भागात 'तुला शिकविन चांगला धडा' या झी मराठीवर नव्यानं सुरु झालेल्या मालिकेतील टीम आली होती.

या मालिकेत मृणाल कुलकर्णी यांची सून अभिनेत्री शिवानी रांगोळे मुख्य भूमिकेत आहे. तर कुशल आणि भाऊ या 'चला हवा येऊ द्या' च्या टीमनं शिवानी संदर्भातच काही विनोदी पंचेस मारले आहेत.

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

'चला हवा येऊ द्या' च्या स्कीटमध्ये, शिवानी काम करतेय म्हणून मृणाल कुलकर्णींना घर सांभाळावं लागतंय. सून कामाला बाहेर पडली म्हणून सासूला किचनमध्ये राबावं लागतंय. त्या कुठे दिसत नाहीत..अशी चर्चा सुरु असतानाच मध्येच कुशल एक सॉल्लिड पंच मारताना दिसतो.

तो शिवानीला पाहत म्हणतो, 'अरे ही दिसते जामची बरणी अन् वागायला उषा नाडकर्णी...'आणि मग काय एकच हशा पिकलेला दिसतो.

खुद्द् शिवानीलाही त्याक्षणी हसू आवरत नाही. व्हिडीओ बातमीत जोडलाय नक्की पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT