Aamir Khan in Laal Singh Chaddha
Aamir Khan in Laal Singh Chaddha Google
मनोरंजन

Laal singh Chaddha फ्लॉप होईल तर 'याच' कारणानं, आमिरनं व्यक्त केली भीती

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha :आमिर खान(Aamir Khan) बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. त्याच्या लाल सिंग चड्ढा सिनेमामुळे सध्या तो भलताच चर्चेत असलेला पहायला मिळत आहे. कारण आहे लाल सिंग चड्ढाला होणारी बायकॉटची मागणी. आमिर खाननं भले प्रेक्षकांना यावर बहिष्कार न टाकण्याचं आवाहन केलं आहे पण अभिनेता मनातून मात्र चांगलाच दडपणाखाली आहे. आमिरला भीती वाटू लागलीय की बॉलीवूडच्या इतर सिनेमांप्रमाणे त्याचा लाल सिंग चड्ढाही बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटणार आहे.(Laal Singh Chaddha Flop Movie, What Aamir Khan say,blames Ott)

आमिर खानने नुकतंच एक वक्तव्य केलं आहे,ते ऐकल्यानंतर आमिरला आपला सिनेमा फ्लॉप होण्याची भीती वाटतेय हे स्पष्ट जाणवत आहे. आमिर खानने ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी एक मोठं हैराण करणारं वक्तव्य केलं आहे. आमिर खानने बॉलीवूड सिनेमे बॉक्सऑफिसवर न चालण्याचं खापर ओटीटी प्लॅटफॉर्मवर फोडलं आहे. आमिर खानचे म्हणणे आहे की, थिएटरमध्ये सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी तो ओटीटीवर रिलीज होतो,आणि मग त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर होतो.

आमिर खानने लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर ६ महिन्यांनी ओटीटीवर स्ट्रीम केला जाईल अशी घोषणा केली होती. बॉलीवूड सिनेमांविषयी आमिर खानने मोठं वक्तव्य एका मुलाखतीत काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानं सिनेमे बॉक्सऑफिसवर चालत नाहीत याचं खापर ओटीटीवर फोडलं होतं. सिनेमागृहात सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही कालावधीनंतर ओटीटीवर रिलीज होतात. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकताच उरत नाही. त्यामुळे मी माझे सिनेमे रिलीजनंतर ओटीटीवर प्रदर्शित करताना सहा महिन्यांचे अंतर ठेवीन.

आमिर खानला माहितीय की त्याच्या विचारांमध्ये आणि इंडस्ट्रीच्या ट्रेंडमध्ये फरक आहे. पण त्याचा आपल्याला कही फरक पडत नाही असंही तो म्हणाला, मला माहित नाही इंडस्ट्री कोणत्या नियमांना फॉलो करते, पण मी माझे सिनेमे थिएटरनंतर ओटीटीवर आणताना ६ महिन्यांचे अंतर ठेवीन.

तुमच्या माहितीसाठी इथे नमूद करतो की या वर्षी बॉलीवूडचे बिग बजेट सिनेमे रिलीज झाले. जसे की पृथ्वीराज,हिरोपंती २, बच्चन पांडे....हे सगळेच सिनेमे बॉक्सऑफिसवर चांगलं प्रदर्शन करण्यात अयशस्वी ठरले. तसंच अनेक सिनेमे प्रदर्शनाआधीच वादातही पडले,ज्याचा परिणाम त्यांच्या बॉक्सऑफिसच्या कमाईवर झाला. अशात आता आमिरचा लाल सिंग चड्ढाही रिलीज होण्याआधी वादात सापडला आहे,त्यामुळे बोललं जात आहे की आमिरचा सिनेमा बॉक्सऑफिसवर कमाल करणार नाही. पण निर्माता-दिग्दर्शकाला मात्र लाल सिंग चड्ढा या आपल्या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT