Laal Singh chaddha Review aamir khan film release in pakistan  Google
मनोरंजन

Laal Singh Chaddha चे नाव का जोडले जातेय पाकिस्तानशी? समोर आली मोठी माहिती

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्ट,२०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज झाला आहे.

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित लाल सिंग चड्ढा सिनेमा अखेर सिनेमागृहात रिलीज झाला आहे. आमिर खानच्या या सिनेमाची जगभरातील त्याचे चाहते प्रशंसा करतान दिसत आहेत. आता बोललं जात आहे की आमिरचा लाल सिंग चड्ढा आता पाकिस्तानाताही रीलिज होण्याची शक्यता आहे.(Laal Singh chaddha Review aamir khan film release in pakistan)

२०१९ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानात बॉलीवूडचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. पाकिस्तानात फक्त हॉलीवूड आणि रीजनल सिनेमे प्रदर्शित केले जतात. त्याच दरम्यान आता बातमी कानावर पडतेय की पाकिस्तानात आमिर खानचा लाल सिंग चड्ढा रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे भारतीय मात्र हैराण आहेत.

यासदंर्भात सिनेपॅक्स मीडिया ग्रुपचे जनरल मॅनेजर साद बेग यांचे म्हणणे आहे की, सूचना मंत्रालयात लाल सिंग चड्ढासाठी NOC जमा करण्यात आली आहे. जर सूचना मंत्रालयानं NOC दिली तर पाकिस्तानात लाल सिंग चड्ढा रिलीज होऊ शकतो.

तर दुसरीकडे मात्र सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आणि सिंध बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या प्रतिनिधींनी मात्र पाकिस्तानात कोणताही भारतीय सिनेमा रीलिज करण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. तर सूचना मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की लाल सिंग चड्ढा सिनेमाला रिलीजसाठी एक NOC देण्यात आली आहे. सिंध सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांना अद्याप कोणत्याही NOC संदर्भात निवेदन मिळालेलं नाही. एकदा सिनेमाला मिनिस्ट्री आणि CBFC यांचे अप्रूव्हल मिळालं की मग त्याला बोर्डाकडे समिक्षेसाठी पाठवलं जाईल.

जर आमिरच्या लाल सिंग चड्ढा सिनेमाला NOC मिळाली,तर तो पाकिस्तानात रिलीज केला जाईल. 2019 पासून पाकिस्तानी थिएटर्समध्ये भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावर बंदी आणली गेली आहे. आता पहायचं की आमिर खान आणि करिना कपूर यांच्या लाल सिंग चड्ढा सिनेमामुळे दोन देशांच्या विचारांत फरक पडतो का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT