Laapataa Ladies Marathi Review:  sakal
मनोरंजन

Laapataa Ladies Marathi Review: पत्नी हरवल्याचे दुःख आणि मग... विनोदाबरोबरच सामाजिक संदेश देणारा लापता लेडीज

Laapataa Ladies Marathi Review: बिप्लब गोस्वामी यांनी सध्या रिेमेक आणि सिक्वेलच्या प्रेमात अडकलेल्या निर्मात्या व दिग्दर्शकांना या चित्रपटाद्वारे चांगलीच चपराक दिली आहे.

Chinmay Jagtap

काजल बागुल

हिंदी चित्रपटसृष्टीत मेघना गुलजार, जोया अख्तर, किरण राव अशा काही महिला दिग्दर्शकांनी आपल्या नावाचे एक वलय निर्माण केले आहे. त्यांचे चित्रपट वैविध्यपू्र्ण आणि वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांची दिग्दर्शनाची स्टाईल निराळी आणि विषयाची निवडही वेगळी असते.

आता प्रदर्शित झालेल्या आमीर खान प्राॅडक्शनच्या किरण रावनेदिग्दर्शित केलेल्या लापता लेडीज या चित्रपटाचा विषय आणि त्याची मांडणी निराळी आहे. विशेष म्हणजे आमीर खान, किरण राव आणि लेखक बिप्लब गोस्वामी यांनी सध्या रिेमेक आणि सिक्वेलच्या प्रेमात अडकलेल्या निर्मात्या व दिग्दर्शकांना या चित्रपटाद्वारे चांगलीच चपराक दिली आहे.

या चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी ती मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारी आहे. आजही काही ठिकाणी सुरू असलेली हुंडा देण्याची प्रथा..., मुलींना स्वावलंबी बनून त्यांच्या विचारांनुसार त्यांना जगू देणे.. तसेच मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे अशा विविध सामाजिक मुद्दयांना या चित्रपटामध्ये स्पर्श करण्यात आला आहे.

या चित्रपटाची कथा नववधू आणि वरांभोवती फिरणारी आहे. दीपक (स्पर्श श्रीवास्तव) हा आपल्या नववधूला अर्थात फुल (नितांशी गोयल)ला घेऊन गावी निघालेला असतो. तो ज्या ट्रेनने निघालेला असतो त्याच ट्रेनमध्ये दुसरे एक नवीनच लग्न झालेले जोडपे असते. लग्नाचा हंगाम असल्यामुळे नववधूंनी त्यांच्या रीतिरीवाजानुसार बुरखा (चेहऱ्यावर पदर) घातलेला असतो आणि त्याचमुळे गोंधळ होतो.

दीपक आपल्या घरी येतो आणि जेव्हा त्याच्या पत्नीचा डोक्यावरील पदर बाजूला केला जातो तेव्हा त्याला धक्का बसतो. कारण त्याने आपल्या पत्नीऐवजी दुसऱ्याची नववधू घरी आणलेली असते. पुष्पा (प्रतिभा रंता) असे तिचे नाव असते. मग दीपक आपल्या पत्नीचा शोध सुरू करतो. शोध घेता घेता तो पोलिस स्थानकामध्ये जाऊन आपली पत्नी हरवली असल्याची तक्रार देतो. पोलिस अधिकारी (रवी किशन) आपल्या परीने तपास करायला सुरुवात करतात.

मग दीपकची पत्नी कुठे आणि कशी राहात असते...ही पुष्पा कोण आणि कुणाची पत्नी असते...पोलिस कशा पद्धतीने याचा तपास करतात वगैरे वगैरे प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील. दिग्दर्शिका किरण रावने ही हलकीफुलकी कथा विनोदी ढंगामध्ये मांडली आहे. विविध सामाजिक मुद्द्यांना स्पर्श करताना उपदेशाचा ओव्हरडोस होणार नाही याची पुरेपूर काळजी तिने घेतली आहे. त्याबद्दल किरण राव आणि त्यांच्या टीमचे कौतुक करावेच लागेल.

महत्त्वाचे म्हणजे मोठे स्टार्स वा मोठेमोठे सेट्स न लावता चित्रपटाची कथा छान गुंफण्यात आली आहे. अभिनेता स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, नितांशी गोयल, प्रतिभा रंता अशा सगळ्याच कलाकारांनी या चित्रपटात अप्रतिम अभिनय केला आहे.

निरागस आणि भोळ्या दीपकची भूमिका स्पर्शने कमालीची साकारली आहे. लग्ना झाल्याचा आनंद, त्यानंतर पत्नी हरवल्याचे दुःख आणि मग तिला शोधण्यासाठी त्याच्या मनाची झालेली घालमेल वा तगमग असे भूमिकेतील विविध कंगोरे त्याने छान टिपलेले आहेत.

फूलच्या भूमिकेत नितांशी खूपच सुंदर दिसत आहे. प्रतिभा रंताने या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे आणि तिने पदापर्णातच आपली चमक दाखविली आहे. भोजपुरी सुपरस्टार रवी किशन पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये चांगलाच भाव खाऊन गेला आहे. चित्रपटातील संवाद खुशखुशीत आहेत.

त्याचे श्रेय दिव्या निधी शर्मा यांना द्यावे लागेल. चित्रपटामध्ये रोमान्स आणि अॅक्शन नसली तरी कथा उत्तम प्रकारे गुंफण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट गुंतवून ठेवणारा झाला आहे. चित्रपटातील संगीत फारसे आकर्षक नसले तरी अन्य चांगल्या बाबींमुळे त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. विनोदी ढंगाने जाणारी ही कथा सामाजिक संदेश देणारी आहे.

-साडेतीन स्टारहिंदी चित्रपट- लापता लेडीज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT