Lalbaugcha Raja visarjan 2023 suddenly heard Sound Chhatrapati Shivaji Maharaj sharad kelkar
Lalbaugcha Raja visarjan 2023 suddenly heard Sound Chhatrapati Shivaji Maharaj sharad kelkar  SAKAL
मनोरंजन

Lalbaugcha Raja 2023: लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु होती, तेवढ्यात छत्रपतींचा आवाज दुमदुमला! नेमकं झालं काय?

Devendra Jadhav

Lalbaugcha Raja 2023: लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात सुरु होती. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरु आहे. लालबागचा राजा काहीच वेळात गिरगाव चौपाटीच्या दिशेने विसर्जनासाठी रवाना होईल.

लालबागचा राजा जेव्हा विसर्जन मिरवणूकीसाठी बाहेर आला. तेव्हा एक विलक्षण गोष्ट घडली. लालबागचा राजाच्या मिरवणुकीवेळीस एका मराठमोळ्या अभिनेत्याचा आवाज दिसून आला.

(Lalbaugcha Raja 2023 Visarjan Update)

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर आला आणि...

लालबागचा राजा आज सकाळी विसर्जन मिरवणुकीसाठी निघाला. विसर्जनासाठी लालबागचा राजा लालबागच्या गल्लीतुन बाहेर आला. हळूहळू राजा मेन गेटच्या इथे आला. आणि अशातच एक आवाज संपूर्ण लालबागमध्ये घुसला.

"लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. उत्सव राजाचा. सोहळा शिवराज्याभिषेकाचा. छत्रपति शिवाजी महाराज की जय , गणपति बप्पा मोरया लालबागच्या राजा".

हा आवाज ऐकताच सर्व लालबागकरांमध्ये एकच उत्साह संचारला. सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा जागर केला. हा आवाज होता अभिनेता शरद केळकरचा.

शरद केळकरने लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणूकीला दिला आवाज

मराठी, बॉलिवूड इतकंच नव्हे तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये गाजवलाय. लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणूकीला शरद केळकरने आवाज दिला. शरद केळकरच्या आवाजाने सर्व कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला.

सर्वांनी शिवरायांचा जयघोष केला. आणि पुढे लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ही संधी दिल्याबद्दल शरद केळकरने लालबागचा राजा उत्सव मंडळाचे आभार मानले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT