Lara Dutta interview on growing older i do not need to fit into any box anymore Google
मनोरंजन

Lara dutta: वाढत्या वयाविषयी लारा दत्ताचं मोठं विधान; म्हणाली,'आता इंडस्ट्रीत...'

लारा दत्तानं गेल्या ५ वर्षात तिला आलेल्या सिनेइंडस्ट्रीतील अनुभवांविषयीचा मोठा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Lara dutta: आपल्या २६ वर्षांच्या करिअरमध्ये लारा दत्ता गेल्या पाच वर्षात इंडस्ट्रीत काम करण्यात जरा जास्तच बिझी दिसतेय. लारानं पुन्हा मोठ्या जोमात इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली आहे. सिनेमापासून वेब सीरिजमध्ये बिझी असणाऱ्या लारा दत्ताचं म्हणणं आहे की वाढत्या वयानं मला अनेक भूमिका करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि म्हणूनच मी आज खूप बिझी दिसतेय. (Lara Dutta interview on growing older i do not need to fit into any box anymore)

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लारा म्हणाली की,''आता मी बिझनेस वुमन,आई,बायको अशा एक अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारतेय. आणि या सगळ्या भूमिका साकारताना मला कधी एका गोष्टीसाठी दुसऱ्या गोष्टीचा त्याग करावा लागला नाही''. या मुलाखतीत लारानं आपल्या सिनेकरिअर संदर्भात मनमोकळेपणानं भाष्य केलं.

लारा दत्ताने ओटीटी प्लॅटफॉर्मविषयी भाष्य करताना सांगितले की,''ओटीटीनं कलाकारांसाठी खूप संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मला वाटतं की मी खरं तर आता माझ्या करिअरमध्ये खूप चांगलं काम करत आहे. मी माझ्या प्रोफेशनल जर्नीमधील एक चांगली फेज आता एन्जॉय करतेय. जे सिनेमे आणि शो मी आता करतेय, त्यात मी खूप एक्सायटिंग आणि चॅलेंजिग रोल आता निवडू शकतेय''.

लाराला जेव्हा विचारलं गेलं की, 'वय कुठे भूमिकांच्या आड येतं का?',तेव्हा ती म्हणाली,''मी माझ्या वाढत्या वयाकडे मला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या रुपात पाहते. मला आता स्वतःला कोणत्या एका कॅटेगरीत फीट करण्याची गरज वाटत नाही. सिनेमातील मुख्य अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स म्हणून मला आजही सगळे ग्लॅमरस रुपातच पाहण्याची इच्छा ठेवून आहेत. पण वाढत्या वयामुळे मला भूमिका निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT