मनोरंजन

पाकिस्तान ते अमेरिका! लतादीदींना आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी कशी वाहिली श्रद्धांजली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar demise) यांचं आज रविवारी 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. भारतातील बॉलिवूड क्षेत्रासहितच राजकीय, क्रीडा, कला अशा सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या जाण्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन देखील शोक व्यक्त केला जातो आहे.

शेजारील राष्ट्र नेपाळ, पाकीस्तान तसेच अमेरिका, इस्रायल आणि इतर अनेक देशांतून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या आवाजाची जादू कायमस्वरुपी राहिल. पुढे त्यांनी म्हटलंय की, लता मंगेशकर या गोड गळ्याच्या गाणसम्राज्ञी होत्या, ज्यांनी अनेक दशके संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवलं. ताज नसलेल्या त्या सम्राज्ञीच होत्या. त्यांचं गाणं येणाऱ्या काळातही लोकांच्या हृदयावर असंच अधिराज्य गाजवत राहिल.

दुसरीकडे भारतातील अमेरिकेच्या राजदूतांनीही ट्विटरवर म्हटलंय की, वयाच्या 92 वर्षी वारलेल्या लता मंगेशकर यांना आम्ही आदरांजली वाहत आहोत. इतिहास त्यांचं नाव भारताच्या संगीत क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरेल.

नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, अनेक नेपाळी गाण्यांना आपल्या सुरेल आवाजाने सजवणाऱ्या प्रसिद्ध भारतीय गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मला दु:ख झाले आहे. असाधारण प्रतिभेने संपन्न असलेल्या स्वर्गीय लता मंगेशकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.

दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट संघाचा कप्तान बाबर आझमनेही ट्विट करत लता मंगेशकर यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्विट करत म्हटलंय की, एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. त्यांचा जादुई आवाज आणि त्यांचा वारसा जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात जिवंत राहील. एक अतुलनीय व्यक्तीमत्त्व! श्रीमती लता मंगेशकरजी यांना श्रद्धांजली, असं त्याने म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cut Outs Removed: शिवाजी पार्क परिसरातील मोदी-शहांचे कटआऊट्स हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई

CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा

Share Market Closing: निफ्टी 22400 पार.. चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी आहे शेअर्सची स्थिती!

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : आरटीई प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार

SCROLL FOR NEXT