Lata Mangeshkar esakal
मनोरंजन

शिवाजी पार्कवर स्मारक नको, वाद थांबवा; मंगेशकर कुटुंबियांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले, त्याच ठिकाणी लता मंगेशकर यांचं स्मारक तयार करावं अशी मागणी भाजप (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. त्यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु झाला असतानाच या स्मारकाबाबत मंगेशकर कुटुंबियांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हृदयनाथ मंगेशकर यांनी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद थांबवावा, अशी विनंती केली आहे. शिवाजी पार्कवर स्मारकाची इच्छा नाही. राजकारण्यांनी स्मारकाचा वाद थांबवावा. आमची ही इच्छा नाही की स्मारक व्हावं, असं त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर स्पष्ट केलं आहे.

'ते संगीत स्मारक व्हावं'

स्मारकावरुन चाललेला हा वाद बंद करावा, दीदीच्या बाबतीत कृपया वाद करु नये. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाचं आश्वासन दिलं होतं. स्वत: दीदींनी तशी मागणी केली होती. उद्धव ठाकरे, उदय सामंत,आदित्य ठाकरेंनी ती आनंदाने मान्य केली होती. तसं संगीत स्मारक व्हावी, अशी इच्छा आहे. दीदी गेल्यानं एक संगीत पर्व संपलंय, एक युगांत संपला आहे.

कदम-राऊत कलगीतुरा

राम कदम यांनी त्यावेळी बोलताना लता मंगेशकर यांच्या चाहत्यांची मागणी आहे की, त्यांचं स्मृती स्थळ करावं, त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी स्मारक तयार करावं अशी मागणी राम कदम यांनी केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले होते की, लता मंगेशकर या कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढारी नाहीत. काही लोकांनी मागणी केली, मात्र मागणी करण्याची गरज नाही, दीदी आपल्या सर्वांच्या आणि जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल असं स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार तयार करेल असं संजय राऊत म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT