मनोरंजन

Lata Mangeshkar: दीदींच्या मनात 'ती' खंत शेवटपर्यत राहिली...

वयाच्या ९३ व्या वर्षी कोरोनानं त्यांचं मुंबईत निधन झालं आहे.

प्रणाली मोरे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणजे भारताला मिळालेली एक दैवी देणगी. सुरांचा हा एक अध्याय आज संपला खरा पण आयुष्यभरासाठी एक मौलिक देणगी प्रत्येकाला देवून गेलाय हे नक्की. भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील ब्रीचकॅंडी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली अनेक दिवस तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांची तब्येत वर-खाली होत होती पण त्यानंतर मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून आली होती. काहीच दिवसांपूर्वी त्यांचे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. आणि लवकरच त्यांना इस्पितळातून घरी सोडले जाईल असंही सांगण्यात येत होतं. पण अचानक काल रात्री त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्या कारणानं पुन्हा त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. अखेर आज सकाळी आठच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले आहे.

लता दिदींच्या अशा खुप आठवणी मनात आहेत ज्या त्यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं ऐकण्याचा योग आला होता. एकदा त्या म्हणाल्या होत्या,''माझ्या मनात एक खंत कायम राहील''. आता त्यांच्या या बोलण्यार आपण सगळेच विचार करू नाही का. एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्त्वाला कसली बरं खंत. आज आपल्या गुणांच्या,मेहनतीच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संगीत उपासनेच्या बळावर त्यांनी सगळं तर मिळवलंय, मग कसली खंत. हो,त्यांना खंत होती शास्त्रीय संगीत मनासारखं गायला मिळालं नाही या गोष्टीची. त्या म्हणाल्या होत्या''मी सिनेमात शास्त्रीय संगीत गायलंय. पण तसं गाण्यात काहीच अर्थ नाही. खरं शास्त्रीय संगीत तर वेगळंच असतं. त्यातला आनंद काही औरच. मला सिनेसंगीतात व्यस्त झाल्यामुळे शास्त्रीय संगीतासाठी जसा रियाज करणं अपेक्षित असतं तसा रियाज कधीच करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे शास्त्रीय संगीत हवं तसं न गायल्याची खंत कायम माझ्या मनात राहील''.

तेव्हा सिनेसंगीतात इतकं मोठं नाव झाल्यानंतरही त्या म्हणाल्या होत्या,''सिनेमातलं गाणं हे काही गाणं नाही. खरं तर पहिला दर्जा हा नेहमी शास्त्रीय संगीताचा,त्यानंतर सुगम संगीत आणि मग सिनेसंगीत. आणि नेमकं त्या शास्त्रीय संगीताला पुरेपुर आत्मसात करण्यासाठी वेळेअभावी मी मुकले याची सल कायम मनात राहणार. माणूस कधीच परिपूर्ण होत नाही. या मताची मी असल्यानं मला माहित आहे मला मरेपर्यंत शिकायचं आहे. त्यामुळे मला सगळं येतं असं मी कधीच म्हणत नाही,म्हणणारही नाही. वेळ आहे,सुंदर आयुष्य आहे, मी माझं गाणं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जपणार''...असं त्या त्यावेळी म्हणाल्या होत्या. आपल्यातनं हा सुवर्ण स्वर आज हरपला असला तरी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून त्या कायम आपल्या सोबत राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT