Lata Mangeshkar Health Upadate 
मनोरंजन

लतादीदींच्या प्रकृतीविषयी कुटुंबीयांनी केली विनंती

लतादीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

स्वाती वेमूल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादीदींना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या १५-१६ दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या काळात त्यांच्या प्रकृतीविषयी अफवासुद्धा सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि लतादीदींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

लतादीदींच्या कुटुंबीयांकडून विनंती

'डॉ. प्रतित समदानी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमकडून लतादीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तुम्ही नकारात्मक अफवांना बळी पडू नका आणि दीदी लवकर बरे व्हाव्यात आणि घरी परत याव्यात यासाठी प्रार्थना करुयात. माध्यमांनीही आम्हाला थोडा वेळ द्यावा. सध्या लतादीदींच्या प्रकृतीपेक्षा काहीही महत्त्वाचं नाही,' असं त्यांनी म्हटलंय.

लता मंगेशकर यांना ९ जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असून कोणतीही अफवा पसरवू नका असं आवाहन त्यांच्या कुटुंबियांसह डॉक्टरांनीही केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT