Lavani dancer Gautami Patil met MP Udayanraje Bhosale esakal
मनोरंजन

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील उदयनराजेंच्या जलमंदिरवर; राजेंना भेट दिली त्यांची आवडती वस्तू

गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचं दैवत आहेत. त्यामुळं मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. त्यांची बरोबरी माझ्याबरोबर नको.

सातारा : गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, सोलापूरमधल्या बार्शी या ठिकाणी गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार दाखल झालीये. आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच ही तक्रार दाखल केलीये.

या प्रकरणाविषयी संपूर्ण माहिती घेऊनच मी माझी भूमिका मांडेन, असं गौतमी पाटीलनं म्हटलंय. अशातच आता काल गौतमी साताऱ्यात आली असता, तिनं भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली.

यावेळी गौतमीनं उदयनराजे यांना खास भेटवस्तू दिली. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलनं काल (सोमवार) खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर (Jalmandir Palace) या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली.

यावेळी गौतमीनं दिलेल्या प्रतिक्रियेत महाराजांना पहिल्यांदाच मी भेटले. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले असल्याचं सांगितलं. या भेटीत तिनं खासदार उदयनराजे भोसलेंना त्यांचा आवडता परफ्यूम भेट दिला. माझे जरी चाहते असले तरी, छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचं दैवत आहेत. त्यामुळं मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. त्यांची बरोबरी माझ्याबरोबर नको, अशी प्रतिक्रियाही तिनं माध्यमांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

SCROLL FOR NEXT