Lawrence Bishnoi ,siddhu Moosevala Esakal
मनोरंजन

Siddhu Moosevala हत्येप्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा खळबळजनक खुलासा.. हत्येआधी हत्यारांसाठी लावली होती अशी फिल्डिंग

२९ मे २०२२ ला पंजाबच्या मानसामध्ये आपल्या गावाला जाताना सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

प्रणाली मोरे

Siddhu Moosevala: गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईसोबत नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीनं केलेल्या चौकशी दरम्यान खळबळजनक माहिती समोर आली आहे. यादरम्यान लॉरेन्स बिश्नोईनं केलेले दावे हैराण करणारे आहेत.

लॉरेन्सनं सांगितलं आहे की पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याचा प्रयत्न त्यानं आधी देखील केला होता, याव्यतिरिक्त लॉरेन्सनं हा देखील दावा केला की त्यानं गोल्डी बरारला ५० लाख रुपये पाठवले होते.(Lawrence Bishnoi Claim he send 50 lacs to goldy brar trying to kill siddhu Moosevala)

लॉरेन्सनं चौकशी दरम्यान एनआईएच्या अधिकाऱ्यांसमोर दावा केला की विक्की मुद्दुखेडाच्या हत्येनंतर त्याचा डोक्यात खूप संताप होता. लॉरेन्स म्हणाला की, सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी सप्टेंब-ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यानं शाहरुख,डॅनी आणि अमन या नावाच्या तीन शार्प शूटर्सना त्याच्या गावी पाठवलं होतं. पण शूटर्सनी लॉरेन्सला सांगितलं की सिद्धूच्या हत्येसाठी आणखी लोकांची गरज लागेल.

सिद्धू मुसेवालाच्या गावात मुक्काम करण्यासाठी शार्प शूटर्सची मदत मोना सरपंच आणि जग्गू भगवानपुरियानं केली होती. यादरम्यान लॉरेन्स गॅंगस्टर गोल्डी बरारच्या संपर्कात होता. लॉरेन्सनं मुसेवालाच्या हत्येच्या प्लॅनिंग दरम्यानच गोल्डीसाठी हवालाच्या माध्यमातून ५० लाख रुपये कॅनडाला पाठवले होते.

यादरम्यान लॉरेन्स बिश्नोईनं हा देखील दावा केला होता की त्यानं २०१८ ते २०२२ दरम्यान उत्तर प्रदेशाच्या खुर्जामधून आपल्या जवळचा गॅंगस्टर रोहित चौधरी याच्या मदतीनं हत्यारं खरेदी केले होते.

ही हत्यारं त्यानं कुरबान चौधरी उर्फ शहजादकडून खरेदी केले होते जो आर्म्स सप्लायर आहे. त्यानं शहजादकडून जवळपास दोन करोड रुपयाचे २५ हत्यारं खरेदी केली होती. ज्यामध्ये AK ४७ व्यतिरिक्त ९ एमएम ची बंदूक देखील सामिल होती. लॉरेन्सचा दावा आहे की या हत्यारांचा वापर सिद्धूला मारण्यासाठी झाला.

तुम्हाला माहितीसाठी सांगतो की २९ मे २०२२ ला पंजाबच्या मानसामध्ये आपल्या गावाला जाताना सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या जीपवर गोळ्या आरपार झाडण्यात आल्या. सिद्धू आणि लॉरेन्स यांच्यात खूप काळापासून वाद सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT