Aamir Khan Latest News Aamir Khan Latest News
मनोरंजन

भाजप नेत्याचा चक्क अभिनेत्याला सल्ला; आमिर खान, बॉलिवूडला उद्देशून म्हणाले...

चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे

सकाळ डिजिटल टीम

Aamir Khan Latest News आमिर खानचा बहुप्रतिक्षित लाल सिंग चड्ढा हा चित्रपट गुरुवारी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत लोकांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहे. सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. चित्रपटाच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांनाही ट्रोल केले जात आहे. आमिर खानने (Aamir Khan) केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली होती. आता भाजप (BJP) नेते आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आमिर खान व बॉलिवूडला चक्क सल्ला दिला आहे.

‘एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून माफी मागावी असा चित्रपट का बनवावा?’, असे मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आमिर खानच्या माफीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. नुकतेच आमिर खानने सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘जर कोणाला चित्रपट पाहायचा नसेल तर तो जबरदस्ती करू शकत नाही. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो’, असे मोहिमेला प्रत्युत्तर देत म्हटले होते.

आमिर खानच्या (Aamir Khan) माफीनाम्यावर नरोत्तम मिश्रा यांनी हे वक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी आमिर खान आणि बॉलिवूडला भविष्यासाठी सल्लाही दिला. ‘आमिर खान आणि त्याच्यासारख्या इतर अभिनेत्यांना, निर्माता-दिग्दर्शकांना विनंती करतो, माफी मागण्यासारखी परिस्थिती का निर्माण होते? विशिष्ट धर्माला टार्गेट करून असे चित्रीकरण का करता? त्यासाठी माफी मागावी लागते’, असेही भाजप नेते (BJP) मिश्रा म्हणाले.

कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात भाष्य करणारे विषय भविष्यात आले नाही पाहीजे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. निर्माता-दिग्दर्शक आणि आमिर खान सारख्या लोकांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असेही नरोत्तम मिश्रा म्हणाले.

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आमिर खानशिवाय करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या रक्षाबंधनसोबत या चित्रपटाची स्पर्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup विजेत्या संघाला ICC कडून नाही, तर BCCI कडून मिळणार कोट्यवधींचं बक्षीस; घोषणाही झाली

Crime: संतापजनक! हातापायावर व्रण येईपर्यंत काठीचे १०५ फटके अन्...; शिक्षकाची १० वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

Viral Video: ५ मजल्यांवरून थेट खाली! मालेगाव महापालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले जीव… थरारक क्षण! व्हिडिओ व्हायरल

Rose Day 2026 Special: ग्लॅमरस लूक हवा आहे? ‘या’ मॅक्सी ड्रेसेस स्टाईल करा आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घ्या

"माझ्यावर टीका करून त्यांना झोप लागतेय.." सचिन पिळगावकर यांचे ट्रोलर्सना खडेबोल; "वैयक्तिक आयुष्यावर.."

SCROLL FOR NEXT