Liger Box Office Collection News esakal
मनोरंजन

लाइगरची बॉक्स ऑफिसवर धुलाई, कमाईचा आकडा पाहून निर्मात्याच्या तोंडाला फेस

सलग चौथ्या दिवशी लाइगरची बॉक्स ऑफिसवर धुलाई

सकाळ डिजिटल टीम

Liger Film Day 4 Box Office Collection : विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा चित्रपट 'लाइगर' गुरुवारी २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रोमोज आणि गाणे पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी चांगली भावना होती. विजय देवरकोंडाने (Vijay Deverakonda) चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार केला. मात्र बाॅक्स ऑफिस रिझल्ट समाधानकारक नाही. समीक्षकांनी चित्रपटाची केलेली नकारात्मक समीक्षा आणि प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचा हा परिणाम दिसत आहे.

हे सर्व मिळून 'लाइगर' ला (Liger) बाॅक्स ऑफिसवर (Liger Box Office) एक म्हणावी अशी सुरुवात झाली नाही. चित्रपटाने पहिल्या दिवसी देशभरात १५.९५ कोटी रुपयांची कमाई केली. आता लाइगरची रविवारची कमाईचे आकडे समोर आले आहे.

ते पाहिल्यानंतर वाटते की विजय देवरकोंडाच्या चित्रपटाचे भविष्य धोक्यात आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार पहिल्या रविवारी लाइगरने बाॅक्स ऑफिसवर ५.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हे चित्रपटाचा भारतीय बाॅक्स ऑफिस कलेक्शन आहे.

भारतात ४० कोटीही नाही

२५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित 'लाइगर'ने बाॅक्स ऑफिसवर शुक्रवारी ७.७ कोटी आणि शनिवारी ६.९५ कोटी रुपये कमवले. जर रविवारचे अंदाजित आकडे जरी यात जोडले तरी चित्रपटाने भारतात आतापर्यंत जवळपास ३० कोटी रुपयांपेक्षा काही जास्त बाॅक्स ऑफिसवर कमाई केली आहे. (Bollywood News)

विदेशात थंड प्रतिसाद

लाइगरला परदेशातही खूप चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवसात जगभरात ४२ कोटींचा ग्राॅस बाॅक्स ऑफिस कलेक्शन (Liger World Wide Collection) केले होते.

भारतातीय कामगिरी पाहाता परदेशात फारसा कमाई होईल याबाबत शंका आहे. एकूण आकडेवारी पाहिल्यास विजय देवरकोंडाच्या चित्रपटाने ४ दिवसांत जगभरातील कलेक्शन ५० कोटींचा आकडाही पार केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT