kangana ranaut
kangana ranaut sakal
मनोरंजन

lock upp : लहानपणी एका मुलाने मला.. लैंगिक अत्याचाराबाबत कंगनाचा खुलासा

नीलेश अडसूळ

lock upp : बॉलीवूडची क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंगनाचा लॉक अप (Lock Upp) नावाचा शो सध्या भलताच चर्चेत आला आहे. त्यामधील स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा शो अंतिम टप्प्यात आला असून भांडण, गुपितं, गॉसिप याचा रोज नवा अनुभव मिळत आहे. या कार्यक्रमाची होस्ट कंगनाही गेल्या काही दिवसात फार चर्चेत आहेत. कधी तिच्या वक्तव्यामुळे तर कधी तिने उलगडलेल्या सिक्रेट्समुळे. असेच एक धक्कादायक सत्य तिने उघड केले आहे.

बॉलीवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त असलेल्या (Bollywood News) कलाकारांमध्ये कंगनाच्या नावाचा समावेश होतो. तिनं यापूर्वी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. त्यामध्ये प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाचा समावेश आहे. जावेद अख्तर संबंधित प्रकरण हे सध्या कोर्टात सुरु आहे. कोर्टानं देखील कंगनाला अनेकदा तिच्या वागण्यामुळे आणि बेताल बोलण्यामुळे फटकारल्य़ाचे दिसून आले आहे. यंदा मात्र कंगनाने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारावर भाष्य केले आहे.

ऑल्ट बालाजीवरील ‘लॉक अप ‘ शो मागच्या काही काळापासून त्याच्या आगळ्या- वेगळ्या थीम आणि संकल्पनेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये स्वतःला शोमधून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक सदस्याला स्वतःचं एक सीक्रेट सांगावं लागतं. अलिकडेच या शोच्या विजेतेपदाचा मजबूत दावेदार मानल्या जाणाऱ्या मुनव्वर फारूखीनं (munnvar farukhi) त्याच्या बालपणाविषयी धक्कादायक खुलासा केला. बालपणी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची कबुली त्याने दिली.

मुनव्वरचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वच सदस्यांना धक्का बसला होता. यानंतर या शोची होस्ट कंगना रणौतनं (kangana ranaut) देखील स्वतःच्या बालपणाबद्दल धक्कादायकक खुलासा केला. कंगना म्हणाली, 'कित्येक लहान मुलांना या अशा अत्याचाराचा सामना करावा लागतो. मात्र उघडपणे या विषयावर बोलले जात नाही. देशातील जवळपास सर्वच मुलांना लहान वयातच नको असलेल्या किंवा वाईट स्पर्शाचा सामना करावा लागतो आणि मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे.' (Lock Upp: Kangana Ranaut reveals she was sexually assaulted as a child by a boy in her town)

'मी लहान असताना आमच्या गावातील माझ्यापेक्षा वयाने २ ते ३ वर्षांनी मोठा असलेला मुलगा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. पण त्यावेळी हे सर्व समजण्याचं माझं वय नव्हतं. त्यामुळे माझ्यासोबत काय घडतंय किंवा जे घडतंय ते चुकीचं आहे हे मला कळत नव्हतं. लहान वयात असं करणाऱ्या मुलांना शिक्षा दिली जात नाही कारण या वयात फारशी समज नसते. पण या घटना ज्या मुलांसोबत घडतात त्यांच्या मनात मात्र अशा गोष्टींबाबत आयुष्यभरासाठी भीती निर्माण होते,' असंही ती म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT