tiya 
मनोरंजन

लॉकडाऊनमुळे कलाकारांनाही बसतेय आर्थिक झळ; 'या' अभिनेत्रीवर आली मदत मागण्याची वेळ... 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असून त्यामुळे अनेकजण नैराश्याचा सामना करत आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढवल्याचा प्रसंग केवळ चाकरमान्यांवरच आला नाही तर चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांनाही त्याचा फटका बसत आहे. लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला असून त्याबद्दल अनेक प्रकरणे विविध मार्गांनी लोकांसमोर येत आहेत. 

चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या 'हॉंटेड 3डी' आणि 'इवील रेकॉर्ड्स' मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री टीया वाजपेयी हिला लॉक डाऊनमुळे मानसिक , शारीरिक व आर्थिकदृष्ट्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. टीयाने मित्र-मैत्रिणींशी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. आत्महत्येचे विचार मनात येत असल्याबद्दल सांगून ही वेळ आमच्या सारख्या कलाकारांसाठी अत्यंत वाईट असल्याचे टीयाने म्हटले आहे. 

टीया म्हणाली की, आर्थिक संकट हे मोठ्या प्रमाणावर असून लॉकडाऊनच्या परिस्थितीत काय करावे सूचत नाही. माझ्याजवळचे असलेले पैसे केव्हाच खर्च झाले आहेत. कोणत्याही प्रकारची बचत संपली आहे. आता मला माहिती नाही कि माझे आता काय आणि कसे होईल. एक आठवडा मी रडले व एक दिवस आईला फोन करून परिस्थिती सांगितली. टीया मार्च महिन्यात तिच्या टीमसोबत आंतरारार्ष्ट्रीय म्युझिक टूर करणार होती आणि त्या संपूर्ण दौर्याचा खर्च तिने केला होता. त्यासाठी तिने हॉटेल, प्रवासाचे सर्व बुकिंग व अन्य सर्व खर्च केला होता. माझे पैसे गेले, आता काय करू, असा प्रश्न तिने मित्रांना केला आहे.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यावर मी कोसळले. मला समजले की आता पाच-सहा महिने काम नसेल व हातातील सर्व पैसै खर्चून बसले. मला माझ्या मित्र परिवाराने आर्थिक मदत केली, असे टीया म्हणाली. सध्या मी ऑनलाईन काम सुरु केले असून गाण्यावर काम सुरु असल्याचे तिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Vardha News: लोकप्रतिनिधींना जमले नाही, ते शेतकऱ्यांनी करून दाखविले; प्रशासनाला दाखविला आरसा, ३० वर्षांनतर हिवरा-पिपरा पांदण रस्त्यावर धावली चारचाकी

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो रिक्षासाठी LPGचा पुरवठा कमी

SCROLL FOR NEXT