Love and Jihad do not go hand in hand said by TMC MP Nusrat Jahan
Love and Jihad do not go hand in hand said by TMC MP Nusrat Jahan 
मनोरंजन

‘लव्ह आणि जिहाद हातात हात घालून चालणार नाहीत'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - धर्म आणि प्रेम यांच्यातील संघर्ष थांबता थांबत नाही. त्याला आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, यांचे संदर्भ मिळाल्यानंतर त्या प्रेमाचा रंग बदलल्याचे दिसून आले आहे. सध्या लव्ह जिहाद यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेक विचारवंत, मान्यवरांनी त्यावर आपले विचार व्यक्त केले आहेत. मात्र त्यावरुन तयार होणारा वाद संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही.

मुळची अभिनेत्री असणा-या आणि आता राजकारणात सक्रिय झालेल्या खासदार नुसरत जहाँने लव जिहादबद्दल मत व्यक्त केले आहे. यात त्यांनी त्यावर गंभीरपणे त्यावर भाष्य केले आहे. पुढील वर्षी  2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्या निवडणूकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यात भाजप व टीएमसीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

यासगळ्यात लव्ह जिहादच्या मुद्यावरून देखील आता वाद पेटला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँने पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत या संदर्भात मत व्यक्त केले आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजपाने लव्ह जिहादचा मुद्दा उचलून धरलेला दिसून आले आहे.

देशभरातील भाजपाशासीत राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्वतः भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे.लव जिहादवर भूमिका मांडताना नुसरत म्हणाली, प्रेम अतिशय वैयक्तिक बाब आहे. लव्ह आणि जिहाद हातात हात घालून चालणार नाही.

निवडणुकांच्या बरोबर अगोदर लोकं हे विषय घेऊन येतात. तुम्हाला कुणाबरोबर राहायचं हा वैयक्तिक मुद्दा आहे. प्रेमात रहा आणि एकमेकांच्या प्रेमात पडणं सुरू करा. धर्माला राजकारणाचं हत्यार बनवू नका. याप्रकारचे मत तिने व्यक्त केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT