made in heaven 2 trailer starring sobhita dhulipala arjun mathur SAKAL
मनोरंजन

Made In Heaven 2 Trailer: पुन्हा मंडप सजणार, सनई चौघडे वाजणार... 'मेड इन हेवन 2' चा ट्रेलर भेटीला

मेड इन हेवन 2 अमेझॉन प्राईम वर रिलीज होतोय

Devendra Jadhav

Made In Heavan 2 Trailer: प्राइम व्हिडियो या भारतातील सर्वात लोकप्रिय एंटरटेनमेंट डेस्टिनेशनतर्फे आज ‘मेड इन हेवन’ या ॲमेझॉन ओरिजिनल सीरीजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

इंटरनॅशनल एमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालेल्या या शोमध्ये भारतीय लग्नसमारंभांमधील परंपरा, आधुनिक महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक रुढी यांच्यातील विरोधाभास दाखविण्यात आला आहे.

(made in heaven 2 trailer starring sobhita dhulipala arjun mathur)

काय आहे मेड इन हेवन 2 चा ट्रेलर

सीझन 1 च्या शेवटी, या सीरीजमधील प्रमुख पात्रे एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली होती. तिथूनच ‘मेड इन हेवन’चा दुसरा सीझन सुरू होतो. नवीन वधु आणि नव्या आव्हानांसह आपले आवडते वेडिंग प्लॅनरर्स त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांना सामे जातात.

‘मेड इन हेवन’चा दुसरा सीझनही अधिक भव्य, रोमान्स, नाट्य, लग्नसमारंभांनी भरलेला असणार आहे. यात काही ओळखीचे आणि काही नवीन चेहरे आणि खिळवून ठेवणारे कथानक आहे.

इंटरनॅशनल एमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालेल्या शोच्या या नव्या सीझनमध्ये यातील व्यक्तिरेखांच्या आयुष्यात अधिक खोल जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लग्नसमारंभ आयोजित करण्याच्या आणि साजरे करण्याच्या किचकट प्रक्रियेतून या व्यक्तिरेखा जात असतात तर दुसरीकडे त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडत असतात.

मेड इन हेवन 2 मध्ये हे कलाकार झळकणार

मेड इन हेवन 2 मध्ये शोभिता धुलिपाला, अर्जुन माथुर, जिम सर्भ, कल्की कोचलिन, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी आणि विजय राज या कलाकारांसोबतच मोना सिंग, इश्वाक सिंग आणि त्रिनेत्रा हलदर हे नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत.

या सीरीजचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नीरज घेवान, नित्या मेहरा, रीमा कागटी आणि झोया अख्तर यांनी केले आहे तर रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि झोया अख्तर व रीमा कागटी यांची टायगर बेबी यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे.

कुठे पाहता येणार मेड इन हेवन 2?

पहिल्या सीझनच्या यशस्वी कामगिरी नंतर मेड इन हेवन 2 आता रिलीज होतोय. मेड इन हेवनच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

आता मेड इन हेवन 2 अमेझॉन प्राईम वर रिलीज होतोय. १० ऑगस्ट पासुन मेड इन हेवन 2 सिरीज अमेझॉन प्राईम रिलीज होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT