Madhurani Prabhulkar shared a car ride video and gives inspiring caption for women
Madhurani Prabhulkar shared a car ride video and gives inspiring caption for women sakal
मनोरंजन

Madhurani Prabhulkar: प्रत्येक स्त्रीनं वेळीच आपल्या आयुष्याचं.. महिलांनो मधुराणीची 'ही' पोस्ट बघाच!

नीलेश अडसूळ

Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते.

ती अनेकदा खूप सुंदर अशा वैचारिक पोस्ट शेअर करताना दिसते. अशातच मधुराणीने एक पोस्ट केली आहे, जी पाहून अनेकांना आणि विशेष करून महिलांना तिने विचार करायला भाग पाडले आहे.

(Madhurani Prabhulkar shared a car ride video and gives inspiring caption for women)

मधुराणी म्हणजेच आई कुठे काय करते मालिकेतील 'अरुंधती'.. या मालिकेतील तिची भूमिका ही महिलांच्या आयुष्यावर बराच सक्रिय परिणाम घडवणारी आहे. एक आई.. एक स्त्री तीचं संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी व्यतीत करते, पण त्या बदल्यात तिला काय मिळतं. या उलट जमेल तसं प्रत्येक जण तिला गृही तधरत असतो. पण त्यातूनच स्वतःच अस्तित्व सिद्ध करणारी अशी ही अरुंधती आहे.

आता तर नवऱ्याच्या विरुद्ध उभं राहून अरुंधतीने दुसरे लग्न केले आहे. मालिकेत जसं ती धाडसीपणे सर्व गोष्टीना सामोरे जात आहे. तसंच प्रत्यक्षातही अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर तितकीच धाडसी आणि खंबीर आहे.

म्हणूनच ती स्त्रियांना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. आजची ही तिची पोस्ट तशीच प्रेरणादायी आहे.

मधुराणीने एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये सुंदर साडी नेसून, गॉगल लावून अरुंधती गाडी चालवत आहे. सोबत छान गाणं ऐकत ती गाडी चालवण्याची मजा घेत आहे. या व्हिडिओला तिने एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे.

''Arundhati.... On the go.. प्रत्येक स्त्रीनं वेळीच आपल्या आयुष्याचं स्टेअरिंग व्हीळ (steering wheel) आपल्या हातात घ्यायला हवं. हे असं.....!'' अशी पोस्ट तिनं केली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिचे कौतुकही केले आहे आणि तिच्या विचारांना पाठिंबाही दर्शवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

SCROLL FOR NEXT