Madhurani Prabhulkar shared post about arundhati and ashutosh wedding in aai kuthe kay karte serial sakal
मनोरंजन

Madhurani Prabhulkar: अरुंधतीचं लग्न.. या वयात? इतकं साजरं करावं? मधुराणीच्या पोस्टनं चर्चेला उधाण..

अरुंधतीचं दुसरं लग्न हा सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे, त्यावरच मधुराणीने भाष्य केलं आहे.

नीलेश अडसूळ

Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा खूप सुंदर अशा वैचारिक पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतीच तिची महिला दिनाची पोस्ट चर्चेत होती. अशातच मधुराणीने एक पोस्ट केली आहे, जी पाहून अनेकांना तिने विचार करायला भाग पाडले आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत नुकताच आशुतोष आणि अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नावरनं देशमुखांच्या घरात तुंबळ युद्ध रंगलेलं पहायला मिळालं. पण सर्वांचा विरोध झुगारून अरुंधतीने हे लग्न केलेच.

हे लग्न व्हावं की होऊ नये यावर प्रेक्षक आपली अनेक मतं मांडत होते. अनेकांचा या लग्नाला विरोध होता, अरुंधतीने तडजोड करावी यावर ते ठाम होते. आता अरुंधतीचे लग्न झाले असले तरी या चर्चा थांबलेल्या नाहीत. उलट या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

(Madhurani Prabhulkar shared post about arundhati and ashutosh wedding in aai kuthe kay karte serial)

सध्या सोशल मीडियावर अरुंधती-आशुतोषच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. कुणी या लग्नाला पाठिंबा दिला आहे तर कुणी विरोध दर्शवत आहे. याच विषयी आज अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीने आपले म्हणणे मांडले आहे.

मधुराणी म्हणते, 'अरुंधतीचं लग्न.... हे व्हावं की नाही... ? ह्या वयात लग्न करावं का...? केलं तर ते इतकं साजरं करावं का ? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना ह्यात आनंद होतोय तर काही जणांना मान्य होत नाहीये.''

''पण मला नक्की असं वाटतं की , कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का ? लग्न आहे ते... साजरं करावं.''


''हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाह चे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.'' अशा शब्दात मधुराणी प्रभूलकरने आपले विचार मांडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT