Madhuri Earned A Whopping Amount For ‘Hum Aapke Hai Koun’, Probably More Than Salman's
Madhuri Earned A Whopping Amount For ‘Hum Aapke Hai Koun’, Probably More Than Salman's Google
मनोरंजन

'हम आपके है कौन' साठी माधुरीला मिळालेलं सलमानपेक्षा जास्त मानधन?झाला खुलासा

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan) आणि माधुरी दिक्षित(Madhuri Dixit) यांचा 'हम आपके है कौन'(Hum Aapke Hai Koun) सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाची क्रेझ आजही लोकांमध्ये भलतीच पहायला मिळते. दोघांनीही या सिनेमात कमाल अभिनय केला होता. या सिनेमातील कुत्रा 'टफी' यानं देखील सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळवल्या होत्या.(Amount For ‘Hum Aapke Hai Koun’, Probably More Than Salman's)

असो,आता या सिनेमातील सलमान-माधुरीच्या मानधनाविषयी वेगवेगळ्या बातम्या कानावर पडत आहेत. माधुरी दिक्षितने देखील एकदा अनुपम खेर यांच्या सोबतच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात या विषयावर चुप्पी तोडत सर्व स्पष्ट केलं होतं. त्यानंतर तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

माधुरी एकदा अनुपम खेर(Anupam Kher) यांच्या एका टॉक शो मध्ये गेली होती. तेव्हा अनेक विषयांवर तिने मोकळेपणाने संवाद साधला होता. यावेळी अनुपम खेर यांनी 'हम आपके है कौन' मध्ये माधुरीनं सलमानपेक्षा जास्त फी घेतली होती या अफवेवर देखील तिला प्रश्न केला. यावर 'धक धक गर्ल' म्हणाली होती,''जर ही बातमी पसरली आहे तर पसरु दे''. तिच्या त्या बोलण्यावरनं तर कळलं होतं की असं काहीच घडलं नसावं

सूरज बडजात्या दिग्दर्शित या सिनेमात माधुरी आणि सलमान मुख्य भूमिकेत होते. तर रेणुका शहाणे,मोनिष बहल, रीमा लागू,आलोक नाथ आणि अनुपम खेर सहाय्यक कलाकारांच्या भूमिकेत होते. हा सिनेमा १९९४ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं बॉक्सऑफिसवर ७.३ मिलियन कलेक्शन केलं होतं.

माधुरीनं बॉलीवुडमध्ये १९८४ साली 'अबोध' सिनेमातून पदार्पण केलं होतं. पण जेव्हा 'तेजाब' रिलीज झाला आणि बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला तेव्हा माधुरी रातोरात स्टार बनली. 'तेजाब'मध्ये माधुरीसोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातील माधुरीच्या 'एक दो तीन' गाण्यावर तर आजच्या जमान्यातही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच पाय थिरकायला मजबूर होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT