raghuveer, raghuveer movie showtiming, raghuveer starcast, appasaheb dharmadhikari, maharashtra bhushan, maharashtra bhushan appasaheb dharmadhikari SAKAL
मनोरंजन

Appasaheb Dharmadhikari: महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींनी रघुवीर सिनेमाला दिले आशीर्वाद

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला आहे

Devendra Jadhav

Appasaheb Dharmadhikari News: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारींना हा पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. याच अप्पासाहेब धर्माधिकारींच्या हस्ते रघुवीर या आगामी मराठी सिनेमाला आशीर्वाद दिले आहेत.

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

(Maharashtra Bhushan Appasaheb Dharmadhikari blessed Raghuveer marathi movie)

रघुवीर सिनेमाच्या टीमने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेयर केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय.. पद्मश्री मा.डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी (आप्पास्वारी) यांना आज महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च असणाऱ्या 'महाराष्ट्रभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रीसमर्थांच्या असीम कृपेने आप्पासाहेबांकडून घडलेल्या कार्याचा या निमित्ताने गौरव करण्यात आला.

मा.आप्पासाहेबांचे रघुवीर चित्रपटाच्या संपूर्ण टीमतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व नमस्कार! 'रघुवीर' चित्रपटासाठी देखील आप्पास्वारींचे आशीर्वाद व शुभेच्छा लाभल्या आहेत.

छत्रपती शिवरायांना आयुष्यात महत्वाचं योगदान असणाऱ्या रामदास स्वामींच्या आयुष्यावर सिनेमा येतोय. रघुवीर असं या सिनेमाचं नाव आहे.

नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर आऊट झालं असून अभिनेता विक्रम गायकवाड समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे

भक्ती अन् शक्तीच्या उपासनेचा, विचार अन् आचार स्त्री सन्मानाचा, देण तुझी ही समर्था, तुज चरणी अर्पण, ही 'रघुवीर' गाथा. अशा पद्धतीने रघूवीर सिनेमाचं प्रमोशन काही दिवसांपूर्वी करण्यात आलंय.

उंच माझा झोका मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता विक्रम गायकवाड या सिनेमातून समर्थ रामदास स्वामींची महत्वाची भूमिका साकारणार आहे.

विक्रमचा समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेतला लूक सोशल मीडियावर व्हायरल कमालीचा व्हायरल झाला.

मुंबई शेजारील रायगड जिल्ह्यातील खारघर परिसरातील एका मोकळ्या मैदानात लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारींना घोषणा झाली.

रविवारी नवी मुंबईतील 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यात सन स्ट्रोकमुळे किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याने दुःखद वळण लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT