kangana ranaut news esakal
मनोरंजन

Kangana Video: 'तुम्हाला आता...' कंगनाची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

राज्यातील राजकारणानं घेतलेल्या अनपेक्षित वळणानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

युगंधर ताजणे

Actress Kangana Ranaut Reaction: राज्यातील राजकारणानं घेतलेल्या अनपेक्षित वळणानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यासगळ्या प्रकरणावर वेगवेगळ्या स्तरांतून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यामध्ये बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौतनं राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगना रनौतचे घरावर पालिकेनं हाथोडा (bollywood actress kangana news) चालवला होता. त्यावरुन कंगनानं आता ठाकरेंना त्या प्रसंगाची आठवण करुन दिली आहे.

राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भुकंप झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून काही दिलासा मिळेल अशी आशा महाविकास आघाडी सरकारला होता. मात्र तसे न झाल्यानं अखेर विधानसभेमध्ये आघाडी सरकारला आपले बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आहे. राज्यामध्ये भाजपची सत्ता स्थापन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासगळ्या प्रकरणात कंगनानं पुन्हा एकदा तोफ डागली आहे.

कंगनानं सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. कंगना व्हिडिओमध्ये म्हणते की, तुम्ही हनुमान चालिसावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आणखी दुसरे काय होणार होते, अशा परिस्थिती तुम्हाला भगवान शिव देखील वाचवू शकणार नाहीत. अशी प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर दिली आहे.

यापूर्वी कंगनानं उद्धव ठाकरेंना त्या घटनेची आठवण करुन दिली आहे ज्यावेळी तिच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर कंगनानं एक व्हिडिओ शेयर करुन सांगितलं होतं की, आज माझं घर तुटलं आहे. उद्या ती वेळ तुमच्यावर देखील आल्याशिवाय राहणार नाही. असं कंगणानं म्हटलं होतं. ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच कंगनाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT