Actress Hemangi Kavi  esakal
मनोरंजन

Hemangi Kavi: 'शिकारीला निघालेल्या लोकांची कधी- कधी शिकार होते'

मराठी - हिंदी चित्रपट मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी कलाकार आहे.

युगंधर ताजणे

Maharashtra Politics Crisis : मराठी - हिंदी चित्रपट मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी कलाकार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तिनं अप्रत्यक्षपणे भाष्य (Marathi Actress Hemangi Kavi) करणाऱ्या पोस्ट केल्या आहे. वास्तविक या साऱ्या पोस्ट तिच्या आगामी एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं केल्या असल्या तरी त्या राजकीय परिस्थितीवर मार्मिकपणे भाष्य करणाऱ्या असल्यानं कवीच्या पोस्टनं लक्ष वेधून घेतलं आहे. काल तिनं केलेल्या एका पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. अखेर हेमांगीला आपण ती पोस्ट कोणत्या आणि कुणावर केली आहे हे तिला सांगावे लागले होते. (Viral News) यावेळी कित्येक नेटकऱ्यांनी हेमांगीला पोस्टवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या.

आता हेमांगीनं काही वेळेपूर्वी शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी शिकार होते, नेहमीच पंजांनी नाही तर कधी कधी डोळ्यांनी होते तेव्हा जपून! अशा (Entertainment News) प्रकारची पोस्ट केली आहे. त्या पोस्टवर तिला नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण भलत्याच कारणांमुळे (Hemangi Kavi News) तापले आहे. त्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत. सध्याचे मविआ सरकार कोसळून नवे सरकार स्थापन होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन दुसरे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्याचे दिसून आले आहे.

हेमांगीनं काल सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यावरुन तिच्यावर टीका करण्यात आली होती. आता कुणाला खरा वाघ म्हणायचं. पहा नेक्स्ट पोस्ट ! अशी पोस्ट तिनं केली होती. या पोस्टवरुन सध्या महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) पक्षातील बंडखोरीवर भाष्य केले. असा सूर नेटकऱ्यांचा होता. अखेर त्यावर वाढत चाललेल्या प्रतिक्रियेवरुन हेमांगीला आपण ती पोस्ट तिच्या आगामी चित्रपटावरुन केल्याचे सांगितले.

त्या पोस्टवरुन हेमांगीला अनेकांनी तुम्ही अभिनयाकडे लक्ष द्या, असे आवाहन केले होते. वाघ समोरुन येतो... समोर यायला वाघ घाबरत नाही. वाघ घाबरुन दुसऱ्या प्राण्यांच्या म्हणजे गेंड्यांच्या वगैरे प्रदेशात पलायनही करत नाही. वाघ स्वतःची भूक भागवण्यासाठी इतरांमध्ये फोडाफोडी करत नाही. त्यामुळे सध्या जंगलातील वाघालाच वाघ म्हणायला हवे, अस खेदाने म्हणावे, अशी परिस्थिती आहे. अशा भावना एका युझर्सनं यावेळी व्यक्त केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : पुढच्या वेळी आदित्य ठाकरेंना दावोसला नेतो - फडणवीस

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT