Ankush chaudhari: Esakal
मनोरंजन

Ankush chaudhari: अंकुश आजही दीपा वहिनीच्या प्रेमात तितकाच वेडा! म्हणाला, माझी बायको माझ्यापेक्षा..

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी हा आजही तितकाच लोकप्रिय अभिनेता आहे. अंकुशने आता पर्यंत सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही वेगवेगळ्या माध्यमातुन प्रेक्षकांच मनोरंजन केले आहे. सध्या अंकुश चर्चेत आहे ते त्याच्या 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटमुळे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.

या सिनेमानिमित्त अंकुश चौधरी याने सकाळ डिजिटलला पॉडकास्ट मुलाखत दिली. यामुलाखचतीत त्याने अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. त्याच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या प्रवासबद्दलही त्याची अन् बायको दिपा परब हिच्यासोबतच्या नात्याबद्दल आणि तिच्या पडद्यावरील कमबॅकबद्दल त्याने या पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या आहेत.

'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातुन तो त्याच्या आयुष्यातील पहिला बायोपिक सिनेमा करत आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याला अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्यात अनेकांनी त्याच कौतुक केलं. यातच ज्यावेळी त्याला त्याची पत्नी दिपा परब हिची प्रतिक्रिया सिनेमा करतांना कशी होती हे विचारलं त्यावेळी त्याने सांगतिलं की, त्याला तिच्या डोळ्यात दिसत होत की तिला त्याचा खुप अभिमान वाटत होता. तो म्हणतो की, 'तिलाही नक्कीच अभिमान वाटेल सांगतांना की 'महाराष्ट्र शाहीर' कोणी केली तर माझ्या नवऱ्याने केला.'

त्यानंतर त्याला जेव्हा विचारण्यात आलं की आता दिपानेही तु चाल पुढे यामालिकेतुन कमबॅक केलयं तर यावर त्याला कसं वाटतं? तो ही मालिका पहातो का? या प्रश्नाच उत्तर देतांना अंकुश म्हणाला की, 'हो मी पाहतो ती मालिका. खुप सोपी आणि घरगूती मालिका आहे. मला ती खुप आवडते. एका स्त्रीला खुप स्वप्न पाहण्याची सवय असते. तिलाही वाटत कि तिला या गोष्टी मिळवायच्या आहेत. पण काही गोष्टी जबाबदारी मुळे त्या करु शकत नाही. तर अशा एका स्त्री ची ही कहानी आहे. जी बाहेर पडायचा प्रयत्न करते. घरातील जबाबदारी पार करुन ती तिच्या ध्येयाचा पाठलाग करते. त्यामुळे ही खुप प्रेरणादायी गोष्ट आहे.

ती खुप छान गोष्ट आहे. त्यामुळे ती मालिका मला खुप आवडते. त्यातले कलाकारही ऐकमेंकाना खुप पुरक आहे. त्यामुळे ही मालिका खुपच छान आहे.

दिपाबरोबर मालिका किंवा चित्रपट करायल अंकुशला आवडेल का असं जेव्हा विचारलं त्यावेळी त्याक्षणाचाही विलंब न करता त्याने सांगितलं की नक्कीच त्याला दिपासोबत काम करायला आवडेल .

यावेळी अंकुश दिपाचं भरभरून कौतुक करतांना म्हणाला की, 'तिच्यासोबत काम करायला आवडेल. तिला खुप चांगले रोल मिळावेत ही माझी इच्छा आहे. मग ती माझ्यासोबत असो किंवा दुसरं कोणा बरोबर.. कारण तिच्यात खुप क्षमता आहे. ती खुप नॅचरल अभिनय करते. जे मलाही जमत नाही. ती खुप उत्तम अभिनेत्री आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT