Maharashtra Shaheer, Maharashtra Shaheer news, gau nako kisna, baharla ha madhumas, ankush chaudhari, kedar shinde SAKAL
मनोरंजन

Maharashtra Shaheer: आणि भर मंचावर अंकुश चौधरीच्या डोळ्यात आलं पाणी.. जुन्या आठवणींमध्ये भावुक

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.

Devendra Jadhav

Ankush Chaudhari News: लवकरच महाराष्ट्र शाहीर सिनेमातून अंकुश चौधरी भेटीला येतोय. अंकुश या सिनेमात शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे.

अंकुश सध्या स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.

अंकुश छोटया दोस्तांना त्याच्या खास शैलीत मार्गदर्शन करत असतो. याच मंचावर एका डान्स परफॉर्मन्सने अंकुशच्या डोळ्यात पाणी आलं.

(maharashtra shaheer fame marathi actor Ankush Chaudhari eyes got teary on stage.. Emotional in old memories)

अंकुश चौधरी... मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुश यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

म्हणता म्हणता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. अंकुश यांचा सुपरस्टार पदापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला.

खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून साकारलेला आपला जीवनपट पाहून अंकुश चौधरी भावूक झाले.

प्रथमने सादर केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने अंकुश यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा खास परफॉर्मन्स या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळतेय. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांचं मार्गदर्शन आणि सुपरजज अंकुश चौधरीचा सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

छोट्या दोस्तांचे असेच नवनवे परफॉर्मन्स मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या शो मध्ये दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येतील.

जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट अशा शाहीर साबळे यांनी रचलेली लोकप्रिय गाणी सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Malvan Achara Road Incident : मालवण-आचरा रोडवर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, २८ वर्षीय महिलेसोबत नेमकं काय घडलं

अशोक सराफ की लक्ष्मीकांत बेर्डे... अनिल कपूर यांचा आवडता अभिनेता कोण? बॉलिवूडचा लखन म्हणाला-

Threat Case: लॉरेन्स बिश्नोईच्या नावे मुंबईत धमकीसत्र, दोन आठवड्यांत तीन सराफांना खंडणीसाठी धमक्या

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

SCROLL FOR NEXT