Maharashtra Shaheer Marathi movie will release on amazon prime OTT platform at 2 june sakal
मनोरंजन

Maharashtra Shaheer: 'महाराष्ट्र शाहीर'चा डफ आता OTT वर कडाडणार! कधी, कुठे आणि कसा पाहाल?

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाची आता मोठी घोषणा..

नीलेश अडसूळ

Maharashtra Shaheer on OTT : गेली एक महिना मराठी मनोरंजन विश्वात केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे 'महाराष्ट्र शाहीर'. हा सिनेमा रिलीज झाला आणि सगळीकडे त्याचे कौतुक होऊ लागले.

केवळ महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही या चित्रपटाचा डंका वाजला आणि विशेष म्हणजे या चित्रपटातील गाण्यांनी अवघ्या जगाला भुरळ घातली. ज्यांना मराठी भाषाच कळत नाही, असेही लोक या गाण्यांवर मनसोक्त थिराकले.

कलाकार, मान्यवर, समीक्षक सगळ्यांनीच या चित्रपटाची भरभरून प्रशंसा केली. आता या चित्रपटा बाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट आपल्याला ओटीटी वर पाहता येणार आहे.

(Maharashtra Shaheer Marathi movie will release on amazon prime OTT platform at 2 june)

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात शाहीर साबळेंच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी झळकला तर त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच भानुमती साबळे यांच्या भूमिकेत सना शिंदे होती. सना ही केदार शिंदे यांची कन्या. या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

तसेच अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. शुभांगी सदावर्ते, निर्मिती सावंत, अतुल काळे असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत.

आता या चित्रपटाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट आता आपण घरबसल्या पाहू शकतो. कारण लवकरच तो ओटीटीवर येणार आहे. यासंदर्भात केदार शिंदे यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा येत्या 2 जून रोजी एमेझॉन प्राइम या ओटीटी साईट वर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी ही पर्वणी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT