maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao shared post for brother on his birthday  sakal
मनोरंजन

Namrata Sambherao: त्या दिवशी पहिल्यांदा तुला मिठी मारून रडले.. नम्रता संभेरावची ही पोस्ट वाचाच..

अभिनेत्री नम्रता संभेराव हिने आपल्या भावासाठी लिहिलेली पोस्ट वाचून तुम्हीही भावूक व्हाल..

नीलेश अडसूळ

Maharashtrachi Hasyajatra fame namrata sambherao: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'नम्रता संभेराव'. तिनं साकारलेली 'लॉली' असो, 'आई' असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले 'पावली' हे पात्र असो. तिच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला हसवलं आहे. मात्र आज नम्रता काहीशी भावनिक झालेली दिसते. कारण नुकताच तिच्या भावाचा वाढदिवस झाला. या निमित्ताने तिने एक खास पोस्ट आपल्या मोठ्या भावासाठी लिहिली आहे.

(maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao shared post for brother on his birthday )

नम्रता संभेराव कामात कितीही व्यस्त असली तरी तिची कुटुंबाप्रती कायमच एक आस्था दिसून आली आहे. सासू, नवरा, मुलगा, नातेवाईक यांच्याविषयी ती कायमच भरभरून लिहीत असते. व्यक्त होत असते. आज तिचे भावाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मोठ्या भावासोबतचा १० वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे आणि काही आठवणींना उजाळा दिला आहे.

यामध्ये नम्रता म्हणते.. ''दादा तू आज जगातला श्रीमंत माणूस आहेस मला गर्व अभिमान वाटतो तुझा कारण तू श्रीशा आणि वीरा दोन मुलींचा बाबा आहेस त्या सुद्धा खूप नशीबवान आहेत त्यांना तू आणि वहिनी आई बाबा म्हणून लाभले तुझ्यात सगळ्यांना सांभाळण्याची खूप ताकद येवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते..''

पुढे ती म्हणते, ''हा आपला 10 वर्षांपूर्वीचा माझ्या लग्नाच्या दिवशीचा फोटो आहे ज्या दिवशी पहिल्यांदा तुला मिठी मारून रडले होते लहानपणी बहीण भावांची कितीही भांडणं झाली तरी हा दिवस आपल्यातलं नातं किती घट्ट आणि आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे हे सांगून जातं..दादा अजूनही आपण जेव्हा बोलतो तेव्हा लहान असल्याचीच भावना येते.. आपल्यातला वेडेपणा असाच टिकून राहो तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..'' अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT