Mahesh Babu Daughter Sitara Fees esakal
मनोरंजन

Sitara : महेश बाबूची लेक एका जाहिरातीसाठी घेते 'इतके' कोटी! कतरिना, दीपिकाला टक्कर

साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता महेश बाबू हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जातो.

युगंधर ताजणे

Mahesh Babu Daughter Sitara Fees: साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता महेश बाबू हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. त्याचं बॉलीवूडविषयी असलेलं मत अनेकांना ठाऊक आहे. आपल्याला कितीही पैसे मिळाले तरी आपण हिंदी चित्रपटात काम करणार नाही. अशी भूमिका त्यानं घेतल्याचे दिसून आले आहे.

यासगळ्यात महेशबाबूची मुलगी सितारा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सिताराची क्रेझ आहे. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद आहे. इंस्टावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे. अशावेळी एका जाहिरातीसाठी सितारानं घेतलेलं मानधन बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. महेश बाबूनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन लिहिलेली पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

केवळ अकरा वर्षांच्या सितारा घट्टामनेनीचा टाईम्स स्क्वेअरवर एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे तिच्याभोवतीची चर्चा वाढली होती. यानंतर सिताराला एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड अॅम्बेसिडरच्या जाहिरात करण्याची संधी मिळाली. हीच जाहिरात टाईम्स स्क्वेअरवरही दाखवण्यात आली होती. त्यानंतर सितारा कोण आहे हे साऱ्या जगाला कळले. तिच्या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव झाला. सितारानं आता बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटी किड्सला मागे सोडले आहे.

मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बाबूच्या लेकीनं एका जाहिरातीसाठी घेतलेलं मानधन हे कतरिना आणि दीपिकापेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. तिनं एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी एक कोटींपेक्षा अधिक पैसे घेतल्याचे सांगण्यात आले आहे. काहींनी हा आकडा ऐकल्यावर महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर वर टीका केली आहे तर काहींनी त्यांचे कौतूक केले आहे.

सितारा ही सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी

काही दिवसांपूर्वी सितारानं एक फोटोशूट शेयर केलं होतं. त्याची खूप चर्चा झाली होती. ४ जुलै रोजी न्युयॉर्क टाईम्सच्या स्क्वेअरवर ते फोटो झळकले होते. त्यानंतर सोशल मीडियावरुन सितारावर कौतूकाचा वर्षाव झाला होता. केवळ टॉलीवूड नाहीतर बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी देखील सिताराचं कौतूक केलं होतं. तिचं अभिनंदही केलं होतं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सितारा आता लवकरच एका मोठ्या बिग बजेट चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यापूर्वी ती तिचे वडील महेश बाबू यांच्या सरकरु वारी पाटामधील एका गाण्यामध्ये दिसली होती. मोठ्या पडद्यावर येण्याची सिताराची ती पहिलीच वेळ होती. सितारा ही आजच्या घडीला सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. तिला १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT