Mahesh Manjrekar Comment on Aamir Khan esakal
मनोरंजन

Mahesh Manjrekar : 'पोपटरावांचे काम मोठे, पण आमिर खानच घेतोय क्रेडिट'!

मराठी, हिंदी चित्रपट विश्वामध्ये आपल्या नावाचा दबदबा आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये महेश मांजरेकर यांचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

Mahesh Manjrekar Comment on Aamir Khan Paani Foundation : मराठी, हिंदी चित्रपट विश्वामध्ये आपल्या नावाचा दबदबा आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये महेश मांजरेकर यांचे नाव घ्यावे लागेल. मांजरेकर हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी देखील ओळखले जातात. एखाद्या गोष्टीवर आपले मत नोंदवताना कोण काय म्हणेल यापेक्षा आपल्याला काय वाटते हे ठामपणे मांडण्यात मांजरेकर नेहमीच अग्रेसर असतात.

आता मांजरेकरांनी एका कार्यक्रमामध्ये पाणी फाउंडेशनचा सर्वेसर्वा आमिर खान याच्यावर निशाणा साधला आहे. निमित्त होते हिवरे बाजारचा कायापालट करणाऱ्या पोपटराव पवारांच्या सत्कार समारंभाचे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून असणाऱ्या मांजरेकर यांनी मतप्रदर्शन करताना पोपटराव पवारांना आता पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात यावे. त्यांचे काम मोठे आहे. सामाजिक कामांमध्ये योगदानही मोठे आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

यावेळी मांजरेकर यांनी पाणी फाउंडेशनवर बोलताना पोपटराव पवारांच्या कामाचे कौतूक केले. पाणी फाउंडेशन उभं करण्यात पवारांचे मोठे श्रेय आहे. मात्र ते आमिर खाननं घेतले. असे म्हणून अनेकांना धक्का दिला आहे. तुमचे काम आहे पण त्याचे क्रेडिट आमिर घेऊन जातो. अशा शब्दांत मांजरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'अस्वस्थ मनाच्या व्यथा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी महेश मांजरेकर अहमदनगरला आले होते.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून आमिर खानच्या पाणी फाउंडेशननं भरीव कामगिरी केली आहे. त्यामध्ये कित्येक मराठी, हिंदी सेलिब्रेटींनी सहभाग घेतला होता. त्यामुळे राज्यातील कित्येक लहान गावांमध्ये पाणी फाउंडेशनचे काम जोरदारपणे झाले. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या त्या गावांसाठी पाणी फाउंडेशननं केलेलं काम कौतूकाचा विषय झाला. अनेक राजकारण्यांनी या उपक्रमाचे कौतूक केल्याचे वेगवेगळ्या कार्यक्रमातून दिसून आले आहे.

पोपटराव पवार यांचा देखील पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात महत्वाचा सहभाग आहे. गावोगावी जाऊन पाणी वाचवा याबाबतचे आवाहन गावकऱ्यांना करुन त्यांच्यात जनजागृती करण्याचे काम पवार यांनी केले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या सामाजिक कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली असून त्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT