Panghrun movie  
मनोरंजन

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरूण'ची उत्सुकता; प्रदर्शनाची तारीख जाहीर

स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी एक विलक्षण प्रेमकहाणी यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

स्वाती वेमूल

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला 'पांघरुण' (Panghrun) हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज यांच्या यशाचं एक वेगळं समीकरण आहे. ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’सारख्या उत्तमोत्तम आणि यशस्वी कलाकृती हे याचं उदाहरण आहे. आता हेच समीकरण पांघरुणमधूनही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी एक विलक्षण प्रेमकहाणी यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटाच्या म्युझिकल ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचं संगीत आणि वैभव जोशी यांच्या शब्दांनी सजलेल्या या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘ही अनोखी गाठ’ आणि 'इलुसा हा देह' या गाण्यांना तर सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले. अनेक चित्रपट महोत्सवासाठीही या चित्रपटाची निवड झाली. १८व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, २८व्या ऑस्टिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पांघरुण’ने प्रेक्षकांची मनं जिंकली. बेंगरुळू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘चित्रभारती इंडियन सिनेमा कॉम्पिटेशन’ या विभागात सर्वोकृष्ट भारतीय चित्रपट हा मानाचा पुरस्कारही पांघरुणने पटकावला.

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात की , "एखादी कलाकृती अशी असते की ती त्या दिग्दर्शकासाठी अतिशय जवळची असते. माझ्यासाठी ‘पांघरुण’ ही तशीच अतिशय जवळची फिल्म आहे. एखादी कथा प्रेक्षकांच्या आवर्जून भेटीस यावी असं अनेकदा वाटत असतं. पांघरुण ही तशीच कथा आहे. जी प्रत्येकाला आवडेल, भावेल आणि बघणारा या कथेच्या प्रेमात पडेल. अमोल, गौरी आणि रोहित यांनी कमालीच्या सुंदर भूमिका अतिशय समजून उमजून साकारल्या आहेत. प्रेक्षकांइतकाच मीही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट बघत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT