mahesh manjrekar talk about if his son satya manjrekar have gay relationship  SAKAL
मनोरंजन

Mahesh Manjrekar: माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये असेल तर.. महेश मांजरेकरांच्या विधानाची एकच चर्चा

महेश मांजरेकरांची निर्मिती असलेल्या एका काळेचे मणी ही कॉमेडी सिरीज रिलीज झालीय.

Devendra Jadhav

Mahesh Manjrekar About Gay Relationship News: मराठीतलं बिनधास्त, बेधडक व्यक्तिमत्व म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकरांनी आजवर त्यांच्या अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर विविध सिनेमांमधुन काम केलंय.

महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले पांघरुण, वास्तव, दे धक्का असे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या विशेष आवडीचे. नुकतंच महेश मांजरेकरांची निर्मिती असलेल्या एका काळेचे मणी ही कॉमेडी सिरीज रिलीज झालीय.

(mahesh manjrekar talk about if his son satya manjrekar have gay relationship)

या सिरीज निमित्ताने महेश मांजकेकरांनी नातेसंबंधांबद्दल भाष्य केलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी बेधडक वक्तव्य केलं.

समजा त्यांना पुढे कळलं की त्यांचा मुलगा गे आहे तर ते काय करतील. या प्रश्नावर मांजरेकरांनी बिनधास्त उत्तर दिलंय ज्याची सध्या चर्चा आहे.

मांजरेकर म्हणाले की, असा एक काळ होता, जेव्हा समाज अशा लोकांना आणि त्यांची नाती स्वीकारायला तयार नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आत्यहत्येच्या घटना घडल्या. पण आता हे चित्र बदललंय. त्यांना आपण स्वीकारतोय.

समझा माझ्या मुलाने सत्याने येऊन मला सांगितलं की तो गे रिलेशनशीपमध्ये आहे, तर मी त्याचा सहज स्वीकार करेन. विरोध करणार नाही. कारण ती त्याची निवड आणि त्याचं आयुष्य आहे.

त्याला हवं तसं आयुष्य जगू देईल. माझ्या मुलीनं जरी हे मला असं काही सांगितलं तरीही मी तिच्या मताचा आणि आयुष्याचा आदर करेन.

एका काळेचे मणी या सिरीजमध्ये पिढ्यांमधील संघर्षा बरोबरच परंपरागत मध्यमवर्गीय मुल्यांचा अंगिकार करणारे पालक, मुलांची जीवनशैली आणि त्यांचे अपरंपरागत मार्ग चोखाळणे यांच्यातील संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे.

अतूल केळकर यांनी दिग्दर्शित करण्यात आलेल्या या सिरीज ची निर्मिती ही महेश मांजरेकर, ऋतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर यांनी केली आहे.

यामध्ये पौर्णिमा मनोहर, ऋता दुर्गुळे, समीर चौघले आणि विशाखा सुभेदार महत्त्वपूर्ण भुमिकेत आपल्याला दिसत आहेत. ही सिरीज Jio Cinemas या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT