Mahesh Tilekar shared post about ravrambha movie and slams who create false historical film
Mahesh Tilekar shared post about ravrambha movie and slams who create false historical film  sakal
मनोरंजन

Mahesh Tilekar: शिवप्रेमींच्या भावनांशी खेळ.. महेश टिळेकर यांनी महाराजांवर चित्रपट बनवणाऱ्यांची अक्षरशः काढली

नीलेश अडसूळ

दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर (mahesh tilekar) हे कायमच समाजातील ज्वलंत विषय आणि समस्यांवर भाष्य करत करतात. अनेकदा त्यांच्या विचारांना ट्रॉलहि केले जाते. पण त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे अनेकदा बदल घडतानाही दिसून आले आहे.

मग तो मनोरंजन विश्वातील कंपूशाहीचा मुद्दा असो की जुन्या अभिनेत्रींना सन्मान देण्याचा मुद्दा असो. ते नेहमीच समाज माध्यमावर सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच ते मराठी नारायण मूर्तींंचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्यांनी मराठी अभिनेत्रींच्या स्वभावाविषयीचा किस्सा सांगितला होता.

आज त्यांनी ऐतिहासिक चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. नुकताच त्यांनी रावरंभा चित्रपट पहिला. हा चित्रपट पाहून त्यांनी एक खरमरीत पोस्ट केली आहे. सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे आलेले पेव पाहता टिळेकर यांची पोस्ट अत्यंत महत्वाची ठरते.

(Mahesh Tilekar shared post about ravrambha movie and slams who create false historical film )

महेश टिळेकर लिहितात की, ''डोळ्यात आणि ह्रुदयात साठवावा 'राव रंभा'.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करीत प्रेक्षकांच्या आणि विशेषतः शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड करणारे काही ऐतिहासिक सिनेमे अलीकडच्या काळात बरेच आले.''

''पण याला एक अपवाद म्हणजे एखाद्या रुक्ष परिसरात सुंदर कमळ फुलांनी भरलेलं जलाशय दिसावं अगदी तसाच 'राव रंभा' सिनेमा आहे.''

''हा सिनेमा आपल्याला सर्वच बाबतीत तृप्त करून एक सुखद अनुभुती देतो. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या मिळाव्यात म्हणून मुद्दाम घुसवलेले ,फिल्मी वाटावे असे संवाद ह्या सिनेमात नाहीत आणि म्हणूनच सिनेमा भावतो.''

''प्रताप गंगावणे यांची पटकथा आणि संवाद कुठेही आपल्याला " कधी संपतोय सिनेमा?" हा प्रश्न मनात येऊ देत नाहीत. सिनेमात विविध पात्रे साकारणारे कलाकार विनाकारण बेबिंच्या देठा पासून दात ओठ खात राक्षसा सारखे किंचाळताना दिसत नाहीत आणि याचमुळे कलाकारांचा अभिनय लक्षात राहतो.''

''सिनेमात (marathi movie) अभिनेता संतोष जुवेकर याने साकारलेला खलनायक इतका चीड आणनारा की जुन्या जमान्यातील खलनायक राजशेखर यांची आठवण आली आणि खंत जाणवली की संतोष इतका गुणी कलाकार मराठीत असताना मराठीत त्याचं म्हणावं तितकं कौतुक झालं नाही.''

''सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये असणारे ओम भूतकर, मोनालिसा बागल ह्या जोडीचा सहज अभिनय हा स्मरणात राहील असा आहे. अभिनेता अशोक समर्थ यांनी साकारलेला तडफदार सरनोबत, त्यांच्या आवाजाची जरब एकदम लाजवाब.''

''युद्धात धारातीर्थी पडतानाचा त्यांचा सीन अंगावर शहारे आणनारा.शंतनु मोघे महाराजांच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे जान आणतो.नाहीतर चेहरा उग्र ठेवून सतत कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार पाहिले की नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का?''

''या सिनेमात छोट्या भूमिकांमध्ये इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. सिनेमाचं अर्ध यश हे प्रत्येक भूमिकेसाठी केलेली योग्य कलाकारांची निवड हे तर आहेच पण त्याबरोबर कॅमेरामन संजय जाधव यांच्यामुळे हा सिनेमा नेत्रदीपक झाला आहे हे प्रत्येक फ्रेम मध्ये जाणवते.''

''चित्रपटातील साहस दृश्ये काळजाचा ठोका चुकविणारी आणि याआधी मराठीतल्या कुठल्याही ऐतिहासिक सिनेमात क्वचितच पहायला मिळालेली अशी आहेत.निर्मितीत कुठेही कसर न ठेवता प्रामाणिकपणे हा सिनेमा भव्य स्वरूपात साकारण्याचे श्रेय दिग्दर्शक अनुप जगदाळे यांचं आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या निर्मात्यांचे...''

''मराठी माणसाचा हा भव्य सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहिल्यास 'राव रंभा ' अनेक काळ डोळ्यात आणि हृदयातही राहील.'' अशा शब्दात टिळेकरांनी रावरंभाचित्रपटाचे उदाहरण देत ऐतिहासिक चित्रपट मनमानी पद्धतीने करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT