mahhi vij cook gives death threat to stab khanjar Google
मनोरंजन

घरच्या कुकची माही विजला धमकी; म्हणाला,'200 बिहारी आणून उभे करीन आणि...'

अभिनेत्री माही विजनं आपल्याला दिलेल्या धमकीसंदर्भात केलेले ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

प्रणाली मोरे

अभिनेत्री माही विजचे (mahhi vij) काही डिलीट केलेले ट्वीट(Tweet) व्हायरल होत आहेत. या ट्वीट्समध्ये तिनं लिहिलं आहे की, तिला तच्या घरातील कुकने(Cook) जीवे मारण्याची(Threat to death) धमकी दिली आहे. माही विजने लिहिलं होतं की,तिच्याजवळ याचा व्हिडीओ देखील पुराव्या दाखल आहे. आता एका मुलाखतीत माहीनं या पूर्ण घटनेविषयी सांगितलं आहे. तिनं सांगितलं की,''तो कुक तिच्याकडे काही दिवसांपासून काम करीत होता. पण तिला काही दिवसांनी कळलं की तो घरातनं काही गोष्टी चोरी देखील करत आहे. माझा नवरा अभिनेता जय भानुशालीनं त्याच्या काम केलेल्या दिवसांचा हिशोब करुन त्याला कामावरुन काढण्याचं ठरवलं तेव्हा तो पूर्ण महिन्याचे पैसे मागायला लागला. यावरनं बाचाबाची झाली आणि त्याने आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. माही म्हणाली की तिला तिची काळजी नाही पण मुलीचा विचार केला की भीती वाटते.(mahhi vij cook gives death threat to stab khanjar)

एका इंग्रजी वेबसाईटल्या मिळालेल्या वृत्तानुसार माही विजने सांगितलं की, तिच्या मुलीला सांभाळणाऱ्या नॅनीनं तिला त्या कुकविषयी अलर्ट केलं होतं. माही म्हणाली,''तीन दिवस झाले होते फक्त तो कुक कामाला लागून, तेव्हाच नॅनीनं आम्हाला त्या कुकनं केलेल्या चोरीविषयी सांगून जागरुक केलं. मी हे जयला सांगण्याचं ठरवलं. जेव्हा जय आला तेव्हा त्यानं हे सगळं ऐकल्यावर लगेच त्याचे झालेल्या दिवसांचे पैसे देऊन जाण्यास सांगितलं. पण तो पूर्ण महिन्याचे पैसे मागे लागू लागला. जेव्हा जयनं त्याला कामावरुन काढून टाकण्याचं कारण सांगितलं तेव्हा म्हणाला,'२०० बिहारी इथे उभे करीन'. त्यानं दारुन पिऊन आम्हाला अर्वाच्या भाषेत शिव्या देखील दिल्या. आम्ही याची तक्रार पोलिसांत केली होती''.

माही पुढे म्हणाली की,''त्या माणसानं कामावरुन काढल्यावरही फोन करुन आम्हाला धमक्या देणं सुरू ठेवलं होतं. माझ्या जवळ त्याचं रेकॉर्डिंग असल्याचं देखील अभिनेत्री म्हणाली. आजकाल आजुबाजूला जे घडतंय,ते पाहिल्यावर मग भीती वाटू लागते. जर त्याने खरंच मला चाकू मारला तर ? मला काही झाल्यावर लोक येतील आणि माझ्यासाठी आवाज उठवतील,पण त्याचा फायदा काय. मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी काळजीत आहे. मला कळलंय की तो जामिनावर सुटेल. मला वाटतंय की तो जेल बाहेर आल्यावर माझ्या कुटुंबाविरोधात काहीतरी गैरवर्तन करेल किंवा माझ्या मुलीला काहीतरी करुन बदला घेईल''. माहीनं ट्वीट मध्ये लिहिलं होतं,''कुकनं मला चाकू पोटात खुपसून मारण्याची धमकी दिली होती''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT