Mahhi Vij reveals her goa flight engine caught fire talked about her experience Google
मनोरंजन

'कुशीत मुलगी अन् फ्लाइटमध्ये आगीचा भडका..' माही विजनं सांगितला जीवघेणा प्रसंग

माही विजनं गोव्याला जाताना फ्लाइटमध्ये आलेल्या भयानक अनुभवाची शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Mahi Vij Flight Incident: जय भानुशाली आणि माही विज हे टी.व्ही वरचं प्रसिद्ध कपल आहे. जय आणि माही दोघेही सोशल मीडियावर भलतेच सक्रिय पहायला मिळतात. सोशल मीडियावर हे कपल नेहमी आयुष्यात आलेले वैयक्तिक अनुभव शेअर करताना दिसतात.काही दिवसांपूर्वीच माही आणि तिची मुलगी तारा एका मोठ्या जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावल्या आहेत. या प्रसंगाविषयी बोलताना माहीने आपल्या आयुष्यातील सगळ्यात जास्त घाबरवून सोडणारा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.(Mahhi Vij reveals her goa flight engine caught fire talked about her experience)

माही विजनं सोशल मीडियावर गोव्याला जाताना विमानात आलेला एक भयानक अनुभव शेअर केला आहे. माही म्हणाली की,विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानं गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या तिच्या विमानाला आग लागली होती. त्या प्रसंगाविषयी बोलताना माही आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे की,''आयुष्याचा काहीच भरोसा नाही. टेक ऑफ च्या काही क्षण आधीच विमानाच्या इंजिनात बिघाड झाला आणि तिथे सर्वत्र धूर पसरला. त्याक्षणी पहिलं माझं लक्ष माझ्या मुलीकडे गेलं आणि पाहतच राहिले. मी स्तब्ध झाले. मी माझी मुलगी ताराचा हात घट्ट पकडून ठेवला होता आणि बस्स देवाचा धावा करू लागले''.

पुढे IndiGo कंपनीचे आभार मानत माही विजनं लिहिलं आहे की,''आम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल IndiGO एअरलाइन तुमचे धन्यवाद. प्रार्थना फळली. तारा सुखरुप आहे. त्यासाठी आपले खास धन्यवाद''. या कॅप्शनसोबत माहीनं आपली मुलगी तारासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. माहीच्या या पोस्टवरनं हे मात्र नक्कीच लक्षात येतं तिनं आयुष्याचं मोल या प्रसंगामुळे अगदी अचूक ओळखलं आहे.

माही विजने आपल्या लेटेस्ट पोस्टचं कमेंट सेक्शन ऑफ करुन ठेवलं आहे, त्यामुळे या पोस्टवर चाहत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हे कळत नाहीय. जय भानुशाली आणि माही विज यांनी २०११ साली लग्न केलं होतं. लग्नानंतर काही वर्ष त्यांना मुल झालं नाही म्हणून त्यांनी आयव्हीएफ ट्रीटमेंटच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला होता. २०१९ साली त्यांनी ताराचं आपल्या आयुष्यात स्वागत केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

रेकॉर्डवरच्या शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Buldhana road accident news: नांदुरा-जळगाव जामोद महामार्गावर दोन दुचाकींची भीषण धडक; २१ वर्षीय युवक ठार, तिघे गंभीर जखमी

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

SCROLL FOR NEXT