mahim Gaiety Galaxy theatre owners face huge loss due to Adipurush demand arrest producer  SAKAL
मनोरंजन

Adipurush Gaiety Galaxy: आदिपुरुष मुळे आमचं नुकसान, त्यांना अटक करा.. गैटी गॅलॅक्सी थिएटरमालकांचा तीव्र संताप

आदिपुरुषला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. याचा फटका थिएटर मालकांना बसलाय

Devendra Jadhav

Adipurush Mahim Gaiety Galaxy News: आदिपुरुष सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आदिपुरुष सिनेमाला अनेक वादाला सामोरं जावं लागलं. आदिपुरुष रिलिजआधी चांगली कमाई करेल अशी सर्वांना खात्री होती.

पण चित्र पालटलं आणि आदिपुरुषला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. याचा फटका थिएटर मालकांना बसलाय. थिएटर मालकांनी आता मनातली घुसमट बाहेर काढायला सुरुवात केलीय.

(mahim Gaiety Galaxy theatre owners face huge loss due to Adipurush demand arrest producer)

आदिपुरुषच्या निर्मात्यांना तुरुंगात टाका

नुकतंच माहीम मधील लोकप्रिय गैटी गॅलॅक्सी थिएटर मालकांची प्रतिक्रिया समोर आलीय. यावेळी थिएटर मालकांनी सगळा राग काढलेला दिसतोय.

मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरचे मालक मनोज देसाई यांनी याविषयी विधान केलंय, 'आदिपुरुष' निर्मात्यांना तुरुंगात टाकले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, "चित्रपटात ज्या प्रकारे भगवान हनुमान आणि रावणाचे प्रदर्शन केले आहे ते अजिबात पटत नाही. क्रिती सेनन सीता कशी असू शकते?" असा सवाल त्यांनी विचारलाय.

आमचं न भरून येणारं नुकसान

माहीम मधील गैटी गॅलॅक्सी थिएटर मालक मनोज देसाई पुढे म्हणाले, "आमचे बरेच नुकसान झाले आहे. केवळ आमचेच नाही तर सर्व चित्रपटगृहांचे नुकसान झाले आहे.

आदिपुरुष मध्ये आधी खटकणारे संवाद होते. ते संवाद त्यांनी आता बदलले आहेत. पण या गोष्टीला खूप उशीर झाला आहे... सिनेमा पाहून येणारे प्रेक्षक आधीच खूप संतापले आहेत." असं वक्तव्य मनोज देसाईंनी केलं

काय सांगतो आदिपुरुषचा कमाईचा आकडा

प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉनची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाने शुक्रवारी दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला. पण आता मात्र आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर जोरदार संघर्ष करत आहे.

ओम राऊत चित्रपटाने पहिल्या आठवड्यात भारतातील सर्व भाषांमध्ये सुमारे ₹260 कोटी कमावले होते आणि शुक्रवारी त्यात फक्त ₹3.25 कोटींची भर पडली.

या चित्रपटाने दोन दिवसांपूर्वीच जगभरात ₹400 कोटींचा गल्ला पार केला होता. आता दुसऱ्या वीकेंडमध्ये हा चित्रपट काही सुधारणा दाखवतो कि थिएटरमधून गाशा गुंडाळतो हे पाहायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT