S.S.Rajamouli ('RRR' movie Director) Google
मनोरंजन

७०० करोड कमावल्यानंतर राजामौली म्हणतायत RRR बनवायचाच नव्हता,मला तर...

RRR सिनेमात छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणारा मकरंद देशपांडे यानं एका मुलाखतीदरम्यानं सिनेमाविषयी अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

एस.एस.राजामौली(S.S.Rajamouli) दिग्दर्शित 'RRR' सिनेमाची सगळ्या जगात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. म्हणूनच तर सिनेमाचं जगभरातलं मिळून बॉक्सऑफिस कलेक्शन ७०० करोडपर्यंत पोहोचलं आहे ते उगाच नाही काही. या सिनेमात अभिनेता मकंरद देशपांडे(Makrand Deshpande) यांची रामचरण आणि ज्युनिअर NTR या सिनेमातील मुख्य अभिनेत्यांसोबत छोटी पण तितकीच उठावदार भूमिका आहे. सिनेमाविषयी बोलताना मकरंद देशपांडे यांनी बाहुबली सारखा सिनेमा बनविणाऱ्या दिग्दर्शकासोबत आपल्याला काम करायची संधी मिळाली यासाठी आनंद व्यक्त केला आहे. याच मुलाखतीत मकरंद देशपांडे यांनी दाक्षिणात्य सिनेमे आणि कलाकार यांच्या कामाचं भरभरुन कौतूक देखील केलं. तर राजामौलींनी सिनेमाविषयी त्याला एक आतली खबर दिली होती याचाही खुलासा त्यानं केला आहे.

मकरंद म्हणाला,'' RRR मधील या भूमिकेसाठी राजामौली यांच्या ऑफिसमधून विचारणा झाली अन् त्यांनी थेट विमानाचं तिकीट पाठवून बोलावून घेतलं. मी माझे केस कापले असल्यानं सुरुवातीला राजामौली यांनी मला लगेच ओळखलं नाही. पण माझ्या केसांमुळे काही अडलं नाही. मी सोबत केसांचा विग घेतला होता. त्यांच्याकडे मेकअप आर्टिस्ट तयार होता. लगेच माझी लूक टेस्ट झाली अन् मला भूमिका मिळाली. रामचरणने माझे काही सिनेमे पाहिले होते,त्याला माझं काम आवडलं होतं. त्यामुळे तो मला खास भेटायला तिकडे आला होता. दाक्षिणात्य सुपरस्टारनं असं म्हणणं माझ्यासाठी आंनददायी ठरल्याचं मकरंद देशपांडे म्हणाले''.

''थोड्या गप्पा मारुन झाल्यानंतर मला सिनेमाचं कथानक ऐकवलं गेलं. राजामौली सरांनीच मला 'RRR' सिनेमाच्या कथेविषयी नरेशन दिलं. खूप मस्त वाटत होतं त्यांच्याकडून कथा ऐकताना. ते मला म्हणाले, ''तुला माहितीय का बाहुबली नंतर मला एका छान छोट्याशा लव्हस्टोरी वर आधारित सिनेमा काढायचा होता. पण माझ्या पत्नीनं मला सांगितलं तुला जे करणं कठीण जातं ते तू कर. तुला जे सहज शक्य होतं ते नको करुस''. म्हणजे मग खरंतर RRR सारख्या कलाकृतीसाठी राजामौली यांच्या पत्नीचेच धन्यवाद मानायला हवे होते. कारण ती नसती तर कदाचित राजामौली यांनी RRR सिनेमा नाही तर एखादी लव्हस्टोरी बनवण्यात आनंद मानला असता. अन् प्रेक्षकवर्ग एका दर्जेदार कलाकृतीला,कथानकाला मुकले असते. पण ७०० करोडचा बिझनेस ज्या सिनेमानं आतापर्यंत केलाय त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला तो सिनेमा बनवायचाच नव्हता हे कळल्यावर मात्र थोडा धक्काच बसेल सर्वसामान्य प्रेक्षकाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai: वसईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार! नायगाव खाडीवर दुमजली पूल; वर मेट्रो, तर खालून वाहने धावणार

Ind vs SA T20 World Cup : दोन देशच नाही, तर दोन भाऊ आमनेसामने, मैदानाबरोबरच डगआऊटमध्ये रंगणार सामना

सोलापूर-धुळे मार्गावर भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू, टाटा नेक्सॉनचा चुराडा

Latest Marathi News Live Update : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

Immunity Boosting Superfoods: वारंवार थकवा आणि सर्दीचा त्रास होतोय? इम्युनिटी बूस्टसाठी खा ‘हे’ एनर्जी देणारे सुपरफुड

SCROLL FOR NEXT