Malaika Arora Arjun Kapoor Bollywood Celebrity  esakal
मनोरंजन

'मलायका - अर्जुनचं शुभमंगल!' तयारी अंतिम टप्प्यात

बॉलीवूडमध्ये ज्या लग्नाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे त्या अभिनेत्री मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडमध्ये ज्या लग्नाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे त्या अभिनेत्री मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात (Bollywood Actress) आली आहे. ते लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे, सोशल मीडियावर नेहमीच आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मलायका ही फिटनेस फ्रिक म्हणूनही लोकप्रिय आहे. (Malaika Arora) वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाच्या फोटोंना चाहत्यांकडून प्रतिसाद मिळतो. काही दिवसांपूर्वी मलायकाला एका अपघातामध्ये (Arjun Kapoor) दुखापत झाली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. दुसरीकडे बॉलीवूडमध्ये अजुनही चाचपडणारा अभिनेता म्हणून अर्जुन कपूरची ओळख आहे. मात्र त्याच्या आणि मलायकाच्या अफेयरनं ही जोडी कायम चर्चेत राहिली आहे.

कॅटरिना कैफ, विकी कौशल, आलिया आणि रणवीरच्या लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर बॉलीवूडच्या चाहत्यांना मलायका - अर्जुन कपूरच्या लग्नाचे वेध लागले होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ ते एकमेकांना डेट करत आहे. त्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या लग्नाविषयी चाहत्यांना सांगितले होते. मलायकानं एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि अर्जुनच्या बाँडिंगविषयी सांगितले होते. त्यामध्ये तिनं अर्जुन आणि आपल्यात चांगला संवाद आहे. आम्ही नेहमीच एकमेकांचा आदर केला आहे. आमच्यात कोणत्याही गोष्टीवरुन वाद नाही. लग्न करताना ज्या अनेक गोष्टींचा विचार केला जातो त्यावर आम्ही मिळून निर्णय घेणार असल्याचे यावेळी मलायकानं सांगितले होते.

यंदाच्या वर्षी मलायका आणि अर्जुन लग्नाच्या बंधनात अडकणार असून मुंबईतच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हे जोडपं लग्न करणार आहे. या लग्नाला केवळ दोघांच्या कुटूंबातील व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचीही माहिती आहे. रणबीर - आलिया, कॅटरिना - विकी कौशल प्रमाणे हे लग्न टॉप सिक्रेट असणार आहे. अरबाज खानकडून घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाचं हा दुसरा विवाह असणार आहे. इतर सेलिब्रेटींप्रमाणे आपल्याला मोठ्या धुमधडाक्यात लग्न करायचे नसल्याचे यापूर्वी दोन्ही सेलिब्रेटींनी एका मुलाखतीतून सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

धक्कादायक! आईशी भांडून घरातून निघालेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तास गाडीत किंचाळत होती, पण कोणीच...

Thane Fire News: नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी; परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT